Monday, June 17, 2019

जुगार अड्ड्यावर छापा,72 हजारांचा मुद्देमाल जप्त

जत,(प्रतिनिधी)-
    अंकलगी ता.जत येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 6 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.72 हजार 340 रूपयाचा मुद्दे माल जप्त केला.कृष्णा आजमाने ,दिलीप कृष्णा कांबळे ,सलीम अब्दुल अपराध ,रवि झेनाप्पा मांग ,भुतन्ना यासप्पा आजमाने ,बिरगीसाहेब हाजीलाल मुल्ला सर्व रा.अंकलगी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

         उमदी पोलीसांनी दिलेली माहिती अशी,अंकलगी येथील पुर्वस कृष्णा कांबळे यांच्या घराच्या पाठीमागे हे तीन पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती.त्यानुसार सोमवारी तीनच्या सुमारास उमदी पोलीसांनी छापा टाकला असता पैसे लावून पत्ते खेळत असल्याचे आढळूंन आल्यांने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर पत्यावर लावलेले 72 हजार 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.यात दोन दुचाकीचा समावेशआहे.सा.पो.नि.कोळेकर,दांडगे,हेकॉ.कोळी,पो.ना.खरात,कुंभारे यांच्या पथकांने कारवाई केली

No comments:

Post a Comment