Tuesday, June 11, 2019

21 वर्षांनी भेटले 'डीएड'चे मित्र


'गेट-टुगेदर'मध्ये ठरले दिव्यांगांना मदतीचा हात देण्याचे; दरवर्षी एकत्र येणार
जत,(प्रतिनिधी)-
'व्हॉटस एप्प' फक्त करमणुकीसाठी नाही,हे अलीकडच्या काळात सिद्ध होऊ लागले आहे. व्हॉटस एप्प ग्रुपमधील सदस्य एकत्र येऊन काही सामाजिक कामात पुढाकार घेत आहेत. अशाच पद्धतीने व्हॉटस एप्प मुळे एकत्र आलेल्या मिरज (ता.जत) येथील शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया अध्यापक विद्यालयातील  1997-99 सालातील डीएड पदवीधारक बॅच च्या विद्यार्थ्यांनी असा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. सध्या शिक्षक म्हणून वावरत असलेल्या या मंडळींनी नुकताच  'गेट-टुगेदर'  मिरज येथे साजरा केला.
संयोजक दीपक कांबळे, अजित वांडरे, नामदेव माळी यांच्या पुढाकाराने  31 मित्र एकत्र आले. 'गेट-टुगेदर' त्यांनी एकमेकांचे गुलाब पुष्प देऊन साजरा केला आणि दरवर्षी एकत्र येण्याचे निश्चित केले. दर महिन्याला काही ठराविक रक्कम आपल्या पगारातून वेगळी काढून वर्षाला गराजवंतांना अर्थसहाय्य करण्याचे ठरले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रिय मित्र कै. विजय करनाळे त्यांचे आकस्मिक निधन डीएड झाल्यानंतर काही दिवसातच झाले. कै. विजय करनाळे यास सर्वांनी दोन मिनिटं शब्द उभे राहून श्रद्धांजली वाहीली. तदनंतर दीपक कांबळे त्यांनी सूत्रसंचालन केले . सूत्रसंचालनामध्ये त्यांनी प्रत्येकाची डीएड मधील अनुक्रमांक घेऊन प्रत्येकाला पाच पाच मिनिटं बोलण्याची संधी दिली. मुकुंद शिनगारे यांची शिक्षण विस्तार अधिकारी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग याठिकाणी निवड झाल्या बद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्रत्येकाने या पाच ते दहा मिनिटात आपल्या डीएड नंतर शिक्षक की सेवा स्वीकारल्यापासून ते आज अखेर सेवेतील व आपल्या आयुष्यातील भरपूर चांगल्या व वाईट घटना कथन केल्या. काही वाईट झालेल्या घटना ऐकून सर्व मित्रमंडळींच्या डोळ्यातून अश्रू आले तसेच काही मित्रमंडळींनी शिक्षकी पेशा मधील कर्तुत्व गुण कथन केले. नवीन सर्व मित्रमंडळींनी एक प्रकारची शपथ घेतली की आज पासून प्रत्येक वर्षी आपण एकत्र येऊन आनंद असाच आयुष्यभर साजरा करायचा.
याप्रसंगी सर्व मित्रमंडळींनी प्रत्येक वर्षी एकत्र येऊन दिव्यांग,मतिमंद गरजू तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून कपडे, वह्या, पुस्तके, पेन  ,पेन्सिल व इतर साहित्य यासाठी दर महिन्यात ठराविक रक्कम सर्व मित्रमंडळींनी एकत्र करून ती प्रत्येक वर्षी या स्वरूपात देण्याचे सर्वसहमतीने ठरवण्यात आले.
गेट-टुगेदर हा संपन्न झाल्यानंतर 11 जून 2019 या रोजी दीपक कांबळे यांनी नॅशनल असोशियन फाँर द ब्लाइंड जिल्हा सांगली. शाखा मिरज या ठिकाणी 2100 रुपये  देऊन ठरल्याप्रमाणे मदत केली याप्रसंगी दीपक कोळी यांनी आपल्या 19 वर्षातील शिक्षक सेवेतील प्रसंग सांगताना शाळेप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून बंधू-भगिनींना कशाप्रकारे मदत केली याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर श्रीकांत थोरवे यांनी आपल्या शिक्षक सेवेतील अनुभवा प्रमाणेच अध्यात्मिक विषयाला धरून कृष्ण सुदामा यांची मैत्रीची कास धरून त्यांनी मैत्री या विषयावर सर्व मित्रमंडळींना उद्बोधन  केले. डीएड करूनही प्रवीण पोतदार यांनी आपले पारंपारिक ज्वेलरी दुकान व्यवस्थित सांभाळत आहे. यावेळी विष्णू ओमासे, पांडुरंग कोळी, शिवाजी राठोड तसेच सर्व मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होते .

No comments:

Post a Comment