Wednesday, June 26, 2019

डिजिटल शिक्षणात हरवतेय सुलेखनाची कला !


जत,(प्रतिनिधी)-
सुंदर हस्ताक्षर काढण्याची कला ज्याला प्राप्त असते, त्याचे सर्वजण कौतुक करत असतात. या उलट ज्याचे हस्ताक्षर खराब असेल त्याची प्रतारणाही जास्त प्रमाणात केली जाते. आताच्या काळात सुंदर हस्ताक्षराची कला ही नाहीशी होऊ लागली आहे. खासगी व प्राथमिक शाळांमधून देण्यात येणार्या डिजीटल शिक्षणामुळे सुलेखनाचे प्रमाण कमी झाले आहे.

कॉप्युटर व मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचेही हस्ताक्षर सुंदर येईनाशे झाले आहे. परिणामी डिजीटल शिक्षणामुळे सुलेखनाची कला ही नाहीशी होवून लागली आहेसुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्राथमिक शाळेपासूनच शिक्षण दिले जाते. बदलत्या काळाप्रमाणे आज बॉलपेन, जेलपेनने फाऊटनपेनची घेतलेली जागा तसेच तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या प्रमाणातून आजच्या पिढीने कंप्युटर व टॅबलेटला जवळ केल्याने सुलेखनाशी नकळत फारकत घेतली आहे. शाळांव्यतिरिक्त पेपरलेस कामकाज केले जात असल्याने ऑनलाईन व्यवस्थेमुळे कागद आणि पेनचे भावनिक नाते संपुष्टात आले आहे. कंप्युटरवरील सततच्या कामामुळे हस्ताक्षर खराब येत असल्याने लिखाणाकडेही दुर्लक्ष होत आहे.
पूर्वी सुंदर हस्ताक्षर येण्यासाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, प्रशिक्षण वर्ग यांचे आयोजन विविध संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळेतून केले जात असे. मात्र, बदललेल्या डिजीटल क्लासरूम व कंप्युटर वापरामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर हे सुंदर येण्याचे प्रमाण घटले आहे. तर पुर्वीच्या काळात दुरेगी चौरेगी वह्यातून देण्यात येणार्या गृहपाठाचेही प्रमाण कमी झाले आहे. खासगी क्लासेसमध्ये शाळेतील सर्वच विषय शिकवले जात असल्याने शाळेतील शिक्षकही शाळेत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येते. कंप्युटरवरून मुलांना शिक्षण देण्यात येत असल्याने पाटी अन् पेन्सील व पेन वापराचे प्रमाण कमी होवू लागले आहे.
मराठीप्रमाणे इंग्रजी हस्ताक्षराबाबतही ओरड असून डॉक्टरांकडून दिल्या जाणार्या औषधांच्या पिस्क्रीप्शनवरील अक्षरही कधी कळत नाही. अक्षर काढण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. मात्र, आजच्या काळात कंप्युटरच्या वापरामुळे मुळची सुलेखनाचे कला ही नाहीशी होवू लागली आहे.
विद्यार्थ्यांच्या हाती टॅब अन् माऊस !
बदलत्या काळानुसार आता शाळेतील शिक्षण पद्धतीतही सुधारणा झाली आहे. पूर्वी पाटी अन् पेन्सीलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. आज मात्र, त्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज डिजीटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पाटी, पेन्सील ऐवजी टॅब अन् कंप्युटरचा माऊस आला आहे.

No comments:

Post a Comment