जत,(प्रतिनिधी)-
जिल्हांअतर्गत
बदली प्रक्रीयेत निर्माण झालेले प्रश्न, शिक्षकांच्या तक्रारी यावर मुख्यकार्यकारी अधिकार्यांच्या
अधिकारात समिती नेमून निकारण करण्यात येणार असून त्यानंतरही तक्रारी राहील्यास संबंधितांना
आयुक्तांकडे जाण्याचा मार्ग मोकळा असेल. त्यामुळे तक्रार असणार्या शिक्षकांना आता सीईओंच्या निर्णयाकडे नजरा लागल्या आहेत.
शासन पातळीवरून बदली प्रक्रिया झाली असून 812 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता या प्रक्रियेत
विस्थापित झालेल्या 77, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या 26
व मागील वर्षीच्या बदली प्रक्रियेतील रँडम राऊंडमधील उर्वरित
184 शिक्षक यांना शाळा देण्यासाठी समुपदेशन होणार आहे. या वर्षीचे विस्थापीत, आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक
व मागील वर्षीचे रँडम राऊंडमधील शिक्षक अशा 287 शिक्षकांची सेवाज्येष्ठता
यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामधुन शिक्षिकांची स्वतंत्र
क व शिक्षकांची स्वतंत्र ड यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यामधुन प्रथम महिला शिक्षिकांचे समुपदेशन घेण्यात येणार असून त्यानंतर शिक्षकांचे
समुपदेशन घेण्यात येणार आहे. समानीकरणातून रिक्त ठेवण्यात आलेल्या
जागांशिवाय इतर जागांवरच या शिक्षक-शिक्षिकांना शाळा मिळणार आहेत.
मागील वर्षीच्या रँडममधील शिक्षकांनी या समुपदेशनात
भाग घेतला नाही तर नवीन शिक्षक भरतीवेळी समानीकरणातील जागांवर अशा शिक्षकांना आधी संधी
दिली जाणार असून त्यांच्या जागांवर नव्या शिक्षकांना पाठवले जाणार आहे. त्यामुळे समानीकरणातील रिक्त जागेवर जाण्याची संधी असेल तर असे शिक्षक या समुपदेशनला
येणार नाही. त्यामुळे रँडममधील 184 पैकी
शिक्षकांनी समुपदेशनाला येण्यापूर्वीच सेवाज्येष्ठता यादी जाहीर झाल्यानंतरच समुपदेशनला
बोलावले जाणार आहे.
No comments:
Post a Comment