Wednesday, June 26, 2019

उमराणीत पावसासाठी गाढवाचे लग्न

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उमराणी येथे पावसाने ओढ दिल्याने श्रद्धा म्हणून ग्रामस्थांनी गाढवाचे रीती रिवाजाने लग्न लावून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

गेल्या वर्ष पाऊस न झाल्याने रब्बी आणि खरीप हंगाम वाया गेला. पाणी टंचाईची तीव्रताही भीषण प्रमाणात जाणवत आहे. आज पावसाळ्यातसुद्धा 109 टँकर ने जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. सध्या सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे, मात्र जत तालुक्यात अजून पाऊस सुरू नाही. त्यामुळे उमराणी येथील ग्रामस्थांनी गाढवाचे लग्न लावून त्यांची सवाद्य मिरवणूक काढली.  यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जत तालुका अध्यक्ष धुंडाप्पा बिराजदार,
राजेंद्र खांडेकर, सुरेश कवटगी, शिवानंद बिरादार यांच्या नेतृत्वाखाली गावातून मिरवणूक काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व राष्ट्रीय समाज पक्ष सर्व कार्यकर्ते व उमराणी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment