Friday, June 21, 2019

पुणे रेल्वे बोर्डाकडे सांगली भागातील विविध मागण्या सादर

जत,(प्रतिनिधी)-
 पुणे येथील विभागीय व्यवस्थापक मध्य रेल्वेच्या कार्यालयात  रेल्वे बोर्डाची बैठक पार पडली.या बैठकीत सांगली जिल्ह्यातल्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. जत येथील बोर्डाचे  संचालक प्रकाश जमदाडे,शिवनाथ बियाणी(कोल्हापूर),बशीर सुतार (पुणे),नारायण मोटे (हातकणंगले) रमेश पाटील (पलूस),महेंद्र जगताप (बारामती) मध्य रेल्वे पुण्याचे अध्यक्ष मिलींद देउस्कर, मध्य रेल्वेचे सचिव सुनील मिश्रा,जे. एन .गुप्ता (ए .डी. एम.) तसेच  रेल्वे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रकाश जमदाडे यांनी जत तालुक्यातील  आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील रेल्वे संबंधित विविध मागण्या मिलिंद देऊस्कर, सुनील मिश्रा यांना दिले. मुंबई -पंढरपुर फाॕस्ट पॕसेजर रद्द करून मुंबई -पंढरपुर-मिरज "विठू माऊली सुफरफास्ट एक्सप्रेस"  ही   दैनिक रेल्वे चालू करावी.या रेल्वेला लोणावळा, तळेगाव, पुणे, दौंड,  कुर्डूवाडी, पंढरपूर , सांगोला, जतरोड,क.मंहकाळ,मिरज येथे थांबे देण्यात यावेत.
पुणे-मिरज-पंढरपुर "पंढरी एक्सप्रेस" रेल्वे चालू करावी . या रेल्वेला पुणे, जेजुरी, सातारा, कराड, ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, सलगरे,क.मंहकाळ, जतरोड,सांगोला येथे थांबे देण्यात यावेत.
कोल्हापूर -सोलापूर इंटरसिटी रेल्वे चालू करावी या रेल्वेला मिरज, सलगरे, क.मंहकाळ, जतरोड, सांगोला, पंढरपूर , कुर्डूवाडी, माढा, सोलापूर येथे थांबे देण्यात यावेत. जत रोड,क.मंहकाळ रेल्वे स्टेशन वरती सध्या एकच फ्लाटफाॕर्म असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते.त्यामुळे तेथे दुसरा फ्लाटफाॕर्म बांधुन नागरिकांना येण्या-जाण्यासाठी दादर बांधावे.  मिरज-लातुर रेल्वे लाईन वरती लुप लाईन संख्या फार कमी आहे त्याला क्रासिंग करता खुप वेळ लागतो त्यामुळे गुळवंची आणि जवळा येथे लुप लाईन टाकाव्यात.
 कराड-पंढरपुर डेमू रेल्वे चालू करावी. मिरज-जत -विजापूर रेल्वे मार्गाचा सर्व्ह या भागात कोणतीही मोठी औद्योगिक वसाहत नाही म्हणून नाकारला गेला तो सर्व्ह पूर्णपणे चुकिचा झालेला आहे  क.मंहकाळ रेल्वे स्टेशन लागुन जेनपीटीचे ड्रायपोर्ट होत असुन तिथे अब्जावधी रुपायांची मालवाहतुक होणार असून या आयात-निर्यात याचा फायदा जतरोड-जत-विजयपूर रेल्वे लाईनला होवू शकतो. रेल्वेने दुसरे कारण दिले आहे आॕपरेटिंग करण्यास अवघड आहे, हेही साफ चुकीचे आहे विजयपूर ते वाडी जंक्शन हा रेल्वे मार्ग मंजूर असल्याने दुसरीकडे कोल्हापूर वैभववाडी नविन रेल्वे मार्गाचे काम चालू असल्याने  हा रेल्वे मार्ग गोवा-हैद्राबाद असा होवू शकतो (गोवा, कोल्हापूर, मिरज, क.महकाळ, जतरोड,जत, विजयपूर, वाडी जं,हैद्राबाद ) यामुळे रेल्वे या मार्गाने आॕपरेटिंग करण्यास  अवघड जाणार नाही त्याचबरोबर ड्रायपोर्ट सुद्धा रेल्वे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळुन रेल्वे आणि  ड्रायपोर्टला दोन्हीला मालवाहतुक मिळून भरपूर अर्थिक लाभ मिळू शकतो. यामुळे मिरज-जत-विजापूर या  रेल्वे लाईनचा झालेल्या सर्व्हेला मान्यता द्यावी.
मुंबई  -सोलापूर-हुबळी मार्गाने जाणाऱ्या अनेक रेल्वे आहेत त्यापैकी दोन ते तीन  रेल्वे पंढरपूर -मिरज मार्गाने सोडून या रेल्वेंना पंढरपूर , सांगोला, जतरोड, क .मंहकाळ येथे थांबा देण्यात यावा.
   मुंबई -कोल्हापूर सह्याद्री ,कोयना,महालक्ष्मी या तिन्हीही एक्सप्रेस पैकी एक रेल्वेला मिरज- पंढरपूर- कुर्डूवाडी जंकशन मार्गाने सोडावीत,या रेल्वेना कवठेमहांकाळ,जतरोड, सांगोला येथे थांबा देण्यात यावा.कारण या भागात पुणे,मुंबई येणारे -जाणारे प्रवाशी खुप आहेत .त्यामुळे नागरिकांची सोय तर होईलच त्यासोबत रेल्वेचासुद्धा अर्थिक फायदा होईल.
सकाळी पंढरपूरहून -मिरज कडे जाण्यासाठी कोणतीही रेल्वे नाही त्यामुळे विद्यार्थी , कामगार आणि मिरज येथे दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या पेंशटची गैरसोय होते. त्यामुळे पंढरपूर येथुन सकाळी सहा वाजता मिरजेकडे निघणारी रेल्वे सोडून त्याला सांगोला,जवळा, डोंगरगाव, जतरोड, गुळवंची, ढालगाव, लंगरपेठ, कवठेमहांकाळ , धुळगाव,सलगरे, आरग,मिरज येथे थांबा देण्यात यावा. कोल्हापूर -हैद्राबाद पंढरपूर ,सोलापूर मार्गाने चालू करावी या रेल्वेला सलगरे,क.मंहकाळ, जत रोड, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, सोलापूर ,अक्कलकोट रोड, गागणापूर, गुलबर्गा, वांडी, हैद्राबाद येथे थांबे देण्यात यावेत .
वाॕस्को-नागपूर दैनिक रेल्वे पंढरपूर -लातूर-अकोला मार्गाने चालू करावी या रेल्वेला सलगरे,क.मंहकाळ,जत रोड,सांगोला,पंढरपूर,कुर्डुवाडी, बार्शि, लातुर, पुर्णा, परळी, अकोला येथे थांबे देण्यात यावेत. मिरज- पंढरपूर-कुर्डूवाडी डेमूच्या 24 तासात 4  फेऱ्या तरी असाव्यात. पंढरपूर - यशवंतपूर (बेंगलुरु) आणि कोल्हापूर -मिरज-नागपूर या रेल्वे दैनिक करून तसेच कोल्हापूर-सोलापूर सध्या चालू असलेली दैनिक एक्सप्रेस या तीनही रेल्वेना जतरोड रेल्वे स्टेशन थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

1 comment: