बालगाव ता.जत येथील अक्कळवाडी,कात्राळ , बोर्गी गुरूदेव आश्रमाच्या वतीने पांरपारिक शेती उभी रहावी,शेतकऱ्यांच्या हितासाठी गुरूवार ता.13 जून रोजी कन्नेरी मठ कोल्हापूरचे काडसिध्देश्वर स्वामीजी,ज्ञानयोगी आश्रम विजयपूरचे सिध्देश्वर स्वामीजी" यांच्या उपस्थितीत 'स्वावलंबी कृषी समावेशक" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाचे प्रमुख अमृतानंद स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जतसह सिमावर्ती भागात सततच्या अवर्षणाने शेती किंबहुना शेतकरी अडचणीत आला आहे. त्याशिवाय उत्पादनाचे घटलेले प्रमाण यावर काम करण्याची गरज आहे.त्यामुळे शेती क्षेत्रात पारपांरिक बियाणे,उत्पादन वाढ यावर मोठ्या प्रमाणात चळवळ निर्माण करत असलेले काडसिध्देश्वर व सिध्देश्वर स्वामीजी यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. पारपांरिक शेतीची माहिती देणारे शेतीमालाचे प्रदर्शन यावेळी ठेवण्यात येणार आहे.शेतकरी स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याशिवाय निसर्गाचा होत असलेला ऱ्हास रोकण्यासाठी बालगाव,बोर्गी,कांतराळ,अक्कळवाडी सह परिसरात वृक्षाच्या रोपाचे वाटप करण्यात येणार आहे.
पर्यावरणाचा समतोल राहावा याकरिता झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे इच्छुक शेतकऱ्यांना एक झाड दान करण्यात येणार आहे या झाडाचे संवर्धन करण्याची जबरदस्त जबाबदारी संबंधित व्यक्तीची असणार आहे .

No comments:
Post a Comment