Thursday, June 20, 2019

माडग्याळ गाव कडकडीत बंद

संख ते मुंबई म्हैसाळ योजनातून पाणी द्यावे निघालेल्या पायी दिंडीस पाठिंबा 
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका दुसकाळी होरपळत असताना शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे . अखेर पूर्ण न झालेल्या वंचित गावाना पाणी मिळावे यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पर्यंत पायी दिंडी काढून मुंबई ला चालेल्या पायी दिडींचे पाठिंबा ही मागणी शासन दरबारी पोचवण्यासाठी गुरुवारी एक दिवस बंद ठेवून चिकलगी मठाधिपती तुकाराम महाराज यांना पाठिंबा दिला आहे .
सकाळी सात ते दहापर्यंत बंद पुकारण्यात आला होता . सकाळी सात वाजता माडग्याळ येथील मेन शेतकरी कटा येथून ग्रामीण रूग्णालयात पर्या मोचा काढण्यात आला .
यावेळी गावातील आजी माजी सरपंच व उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य व महादेव माळी , सिताराम जाधव , लक्षमण माळी , व्हनापा माळी सावकार , पांडुरंग सावंत , बाळासाहेब कोरे , पाडुरंग कोरे , उपसरपंच मलू धुमाळे ,  यांचे सहित अनेक ग्रामस्थ च्या उपस्थित माडग्याळ हा गाव बंद पुकारण्यात आला होता . त्यानंतर गावातील सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू करण्यात आले . सकाळपासून गाव कडकडीत बंद करून पुकारण्यात आला . शासनाने व्यवस्था पणे नियोजन न केल्याने अनेक गावे म्हैसाळ पासून वंचित आहेत . वंचित गावाना पाणी मिळावे  गरजेचं आहे . वंचित गावाना असताना या भागातुन मंगळवेढा व सांगोला या भागातील गावाना पाणी पोचहले आहे .
1)  मायतळपासून व्हसपेठ तलावात पाणी सोडवण्यात यावे . 2 )  व्हसपेठ तलावातून गुडापूर तलावाभरुन घेण्यात यावे . 3 )  शेड्याळ ओढापत्रातून दरीकोणूर तलावपर्यत कामे पूर्ण करावे . कनाटक राज्य तील कनमडी तलावतून पाणी आणुन दरीकोणूर येथून दरीबडची तलावात पाणी सोडण्यास यावीत . या मागणीसाठी तुकाराम महाराज बाबा यांना पाठिंबा बंद पुकारण्यात आला आहे . माच अखेर म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण व्हायल पण ते झालेल्या नाहीत . माडग्याळ मधील बाळासाहेब कोरे म्हणाले , माडग्याळ मध्ये पाणी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे  . आणि त्याचबरोबर शासनाने आठ ते दहा दिवसांत शासनाने माडग्याळ मधील जनावरांना चारा , पाणी व किंवा चारा डेपो शासनाने ताबडतोब यांची दखल घेतली पाहिजे . जर शासनाने दखल न घेतल्यास माडग्याळ ग्रामस्थांनी रस्ता रोको व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाळासाहेब कोरे यांनी व्यक्त केले . त्यामुळे संख ते मुंबई ते आझाद मैदान पायी दिंडी काढून शेतकरी बांधवाचे पाण्याचा प्रश्न सोडविला जावा  या मागणी साठी तुकाराम महाराज बाबा यांनी संख ते मुंबई मंत्रालय पर्यंत पायी दिंडी काढली आहे . अशी मागणी सात जून रोजी संखपासून मुंबई मंत्रालय पर्यंत पदयात्रा काढण्यात आली आहे . तरी आमच्या पाण्याचा प्रश्न विचारात घेऊन सोडवण्यात यावे अशी मागणी होत आहे .

No comments:

Post a Comment