कार्याध्यक्षपदी लखन होनमोरे
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सांगली जिल्हाध्यपदी प्रमोद काकडे यांची फेरनिवड झाली असून जिल्हा कार्याध्यक्षपदी लखन होनमोरे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.निवडी नंतर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी सत्कार केला.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी यांच्या मार्गदर्शन आणि अध्यक्षतेखाली शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी इतर निवडी जाहीर केल्या. बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनी या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सोन्याळचे रहिवाशी आणि जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लकडेवाडी ता जत येथील पात्र पदवीधर शिक्षक लखन होनमोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून महमद रफिक पटेल, विजय रास्ते, कोषाध्यक्षपदी दयानंद सरवदे, जिल्हा सचिव म्हणून विद्याधर रास्ते, मुख्य संघटकपदी अशोक हेळवी, अतिरिक्त सरचिटणीसपदी थोराप्पा कांबळे, टी आर नदाफ यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. संघटक सचिव म्हणून विनोदिनी मिरजकर, महिला प्रतिनिधीपदी सौ. अनिता प्रज्ञावंत, पौर्णिमा व्होटकर, रूपाली चोथे यांची निवड करण्यात आली. तसेच कायदे सल्लागार म्हणून अॅड. शिवाजी कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व पदाधिकारी यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघटनेच्या माध्यमातून अहोरात्र काम करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे मत व्यक्त केले. यावेळी काष्ट्राईब महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी, वरिष्ठ मार्गदर्शक बाजीराव प्रज्ञावंत यांचे हस्ते निवडीचे पत्र, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघ जिल्हा सचिव बाबासाहेब माने, मिरज तालुका अध्यक्ष परशुराम जाधव, कार्यालय सचिव गणेश काकडे,कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व सर्व सदस्य शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment