Sunday, June 16, 2019

नूतनीकरण अभावी कृषी व्यावसायिक अडचणीत

जत,(प्रतिनिधी)-
 जिल्ह्यातीलबहुतांश कृषी व्यावसायिक अडचणीत आले असून सध्या त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे लायसन, परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प आहे. शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही प्रक्रिया बंद असल्याने व्यावसायिकांच्या वर मोठी संक्रांत आली आहे.

व्यावसायिकांना कीटकनाशके, बियाणे यांचे दर दोन वर्षांनी परवाने, नूतनीकरण करावयाचे असते. तर खते विक्रीसाठी तीन वर्षांनी परवाना नूतनीकरण करावयाचा असतो. नूतनीकरण प्रक्रिया ही ऑनलाईन सिस्टिमद्वारे झाली असल्याने व्यावसायिक आपले परवाने तारखे अगोदरच ऑनलाईन चलन भरून त्याची फाईल जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करतात. ती फाईल ३० दिवसांच्या आत व्यावसायिकांना पड़ताळणी करून परत केली जाते,
परंतु गेली एक ते दीड महिनाहून अधिक काळापासून ऑनलाईनची वेबसाईट बंद असल्याने व्यावसायिकांना परवाना नूतनीकरण करण्यामध्ये अडचणी येत आहेत. संबंधित अधिकारी वेळकाढू घोरण अवलंबत आहेत. ऑनलाईन प्रक्रिया (वेबसाईटच) बंद असल्याने ब-याच व्यावसायिकांच्या परवाना नूतनीकरणाच्या तारखा संपून गेल्या आहेत. त्यांनी काय करायचे हा मोठा प्रश्न असून यास जबाबदार कोणाला धरायचे, नूतनीकरणाची तारीख संपली असता जादा फी भरून त्यास एक महिन्याचा अवधी दिला जातो. तोही अवधी आता संपत आला आहे.
परवाना नूतनीकरण नंतरचा एक महिना संपून गेल्यानंतर परवाना रद्दबातल होतो. बहुतांश व्यावसायिकांचे महिन्यांचा अवधीसुद्धा संपत आला आहे. त्या व्यावसायिकांना मोठी अडचण आली आहे. याकडे शासनाने तरी परवाना नूतनीकरणाच्या फाईल्स मिळाले नाहीत. त्यामुळे परवाना असूनसुद्धा दुकानांमध्ये परवाना सटिफिकेट दाखला लावता येत नाही. या गोष्टीकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment