जत,(प्रतिनिधी)-
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून व कोसारी ( ता.जत ) येथे दुचाकी गाडी आडवी मारल्याचा कारणावरून आबासाहेब तुकाराम शिंदे रा. बुरुटे वस्ती शेगाव ( ता. जत ) यांना शिविगाळ करून वायर ,चैन , काठी व दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून सुभाष पाटील , पांडुरंग सोलंकर ,भारत व्हनमाने ,राहुल शिंदे, अवधूत व्हनमाने सर्व रा. शेगाव ( ता. जत ) या पाच जणांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . याबाबत आबासाहेब शिंदे यानी वरील पाच जणांच्या विरोधात मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे , अशी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान शेगाव गावात घडली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , बाबासाहेब तुकाराम शिंदे हे धनश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा या संस्थेची शेगाव, कोसारी , कुंभारी इत्यादी गावात पिग्मी गोळा करण्याचे काम करतात , बुधवारी दिवसभर पिग्मी गोळा करून ते शेगाव येथील हाँटेल विठ्ठल मध्ये रात्री ९ वाजन्याच्या दरम्यान हिशोब करत बसले होते. यावेळी वरील पाच संशयित आरोपी हे हाँटेलच्या बाहेर येऊन थांबले व त्यांनी आबासाहेब शिंदे याना बाहेर बोलावून घेऊन आचानक काठी , चैन व काळ्या वायरने मारहाण करण्यास सुरुवात केली . यावेळी झालेल्या झटापटीत आबासाहेब शिंदे यांच्या जवळ पिग्मी मधून जमा झालेले २९ हजार ७०० रुपये रोख रक्कम व १० हजार रुपयांचा एक मोबाईल हा अज्ञाताने लंपास केला आहे .वरील पाच जणांनी बेदम मारहाण केल्यामुळे शिंदे गंभीर जखमी झाले आहेत .त्यांना उपचारार्थ जत येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार आप्पासाहेब हाक्के करत आहेत.
No comments:
Post a Comment