वाचकांचा पत्रव्यवहार
'कॅन्सर' हा मोठय़ा प्रमाणावर आढळणारा आजार असून, गुटखा-सुपारी-तंबाखू खाल्याने किंवा सिगारेट ओढल्याने 'माऊथ कॅन्सर'ची लागण होते. हा कॅन्सर भारतात लोकांच्या आरोग्यासाठी प्रचंड धोकायदायक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारतातून कॅन्सर नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाज जागृती करण्याची आवश्यकता आहे.
कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटकही आरोग्याच्या दृष्टीने घातक असून, दैनंदिन जीवनात त्यांच्याशी आपला संपर्क येतो. जसे अन्नपदार्थातील बदलांमुळे निर्माण होणारे कार्सिनोजन्स, प्रदूषके, मायक्रो- ऑरगॅनिझम, आरोग्यास घातक जीवनशैली यामध्ये प्रक्रियेला केलेल्या पदार्थांचे सेवन समाविष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभर होणार्या मृत्यूंमध्ये कॅन्सर हे दुसरे प्रमुख कारण आहे आणि 2015 मध्ये कॅन्सरमुळे 8.8 दशलक्ष मृत्यू झाले. जगभर 6 पैकी 1 मृत्यू कॅन्सरमुळे होतो. सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये, टोबॅको-रिलेटेड कॅन्सरचे (टीआरसी) प्रमाण सर्वाधिक आहे आणि कॅन्सरमुळे होणार्या एकूण मृत्यूंपैकी 22 टक्के मृत्यूंना हा कॅन्सर कारणीभूत असतो. जगातील अंदाजे 70 टक्के लंग कॅन्सरशी व भारतातील सर्व प्रकारच्या 40 टक्के कॅन्सरशी तंबाखूचा संबंध आहे. स्वर्णसाथीमध्ये अत्यंत प्रभावी असणार्या नैसर्गिक कक्यरुमिनचे गुणधर्म आहेत. कक्यरुमिन हळद व नैसर्गिक लिकोपेनपासून तयार होत असून त्यामध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत. त्यामुळे प्रतिकारक्षमता वाढते. कार्सिनोजेन्स, दैनंदिन सूज, मुक्त रॅडिकल्स यांचा सामना करण्यासाठी मदत होते.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
No comments:
Post a Comment