Wednesday, June 12, 2019

शालेय साहित्याच्या किंमती वाढल्या

दहा ते वीस टक्के वाढ;' जीएसटी' मुळे व्यवासायिक नाराज
जत,(प्रतिनिधी)-
शाळांच्या सुट्या संपून आता शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. यामुळे बाजारपेठेत शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र, यंदा शालेय साहित्याच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढझाल्याने पालकांचे खिसे रिकामे होत आहेत. तर, या साहित्यावरील वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी)
व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.

शालेय साहित्य खरेदीत छोटा भीम, बार्बी, मोटारी, क्रिकेटपटूची चित्रे असलेल्या बॅग आणि परीक्षा पॅडला विद्याथ्र्यांची पसंती आहे. या वर्षी पेन, पेन्सिल, वह्या, टिफीन बॉक्स, वॉटर बॉटल, सायन्स किट, चित्रकला किट, जॉमेट्रिक बॉक्स खरेदी होत आहे. बाजारात चायनीज स्टेशनरीही मोठ्या प्रमाणात दिसत  आहे. त्यात वेगवेगळ्या आकाराचे पाऊच, तसेच फॅन्सी कंपासचे आकर्षण जास्त आहे. त्याचबरोबर तयार प्रोजेक्ट, तयार वार्षिक नियोजन पत्रक, फ्लॅश कार्ड, पांढरा काळा- फळा यालादेखील मागणी आहे. दरवर्षी प्रमाणे वह्या पुस्तकांना लावण्यात येणाऱ्या खाकी प्लास्टिक कव्हरला यंदा मागणी वाढली आहे. या कव्हरच्या किंमतीत गेल्यावर्षी पेक्षा दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. वह्यांच्या किंमतीत 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. इतर शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत  10 ते 20 टक्के वाढ  झाली आहे.
प्रकल्प वाढला,खर्च वाढला
आताच्या घडीला  अभ्यास कमी आणि प्रकल्प जास्त असा प्रकार आहे. त्यामुळे मुलांच्या शालेय साहित्याचा खर्च वाढला आहे. त्यासाठी वर्षभरात एक ठराविक रक्कम वेगळी काढून ठेवावी लागत आहे.- शोभा ऐनापुरे,पालक
'जीएसटी' मुळे नफा कमी
अवास्तव सवळतीमुळे लोकांचा ऑनलाइन खरेदीकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आम्हालासुद्धा ग्राहकांना चांगली सवलत द्यावी लागत आहे. परंतु, शालेय साहित्य खरेदी विक्रीवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) द्यावा लागत आहे.त्यामुळे नफा कमी होत आहे, असे जनरल स्टोअर्स चे मालक सांगतात.

फोटो ओळ- ( जत शहरातील वाह्यापुस्तकांच्या दुकानात शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे.) छाया-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

No comments:

Post a Comment