Sunday, June 30, 2019

प्रेमाने बोलल्याने जगात शांतता निर्माण होईल-अविनाश जाधव

जत,(प्रतिनिधी)-
मानवी  जीवन मिळाले आहे ते सत्याने जगण्यासाठी, प्रेमाने बोलण्यासाठी. पण जगात  हिंसाचार,व्याभीचार, धर्म अंधपणा आणि त्याच बरोबर नाना प्रकारच्या अनेक समाज विघातक घटना घडत आहे. एकमेकांमध्ये आदरभाव नसल्यानं माणूस माणसापासून दूर चालला आहे. त्यामुळे जगामध्ये सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन  संत निरंकारी मिशनचे युवा प्रचारक अविनाश जाधव (वाई) यांनी जत येथे बोलताना केले.

जत येथील विद्युतनगर येथे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत  कुंभार यांचे वडील कै.विठ्ठलराव कुंभार यांचे प्रथम पुण्यस्मरण  निमित्त सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
       ते पुढे म्हणाले, संत निरंकारी मिशन हे मानवता स्थापन करणारे मिशन आहे. मिशन हे समाजामध्ये एक चांगला मानव घडविते.  ज्ञानाच्या डोळ्याने देव पाहता येतो, त्यासाठी सद्गुरु शरण जावे लागेल. आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व साधु संतांनी सदगुरु शिवाय देवाची प्राप्ती होणे अशक्य आहे, असे  सांगितले आहे.
 आमदार विलासराव जगताप म्हणाले की मानवाने सत्याने, प्रेमाने वागले पाहिजे. प्रेम आणि  दयामध्ये धर्म आहे. जेव्हा आध्यात्म आणी शास्त्र यांचा मेळ घातला जाईल, तेव्हा खरा मानवता धर्म प्रस्तापित होईल. निरंकारी मंडळ हे मानवता प्रस्थापित करण्याचे महान कार्य करीत आहे.
   यावेळी प्रभाकर जाधव, सुनील पवार,उमेश सावंत,गिरमल कांबळे, आबासो काटे यांचेसह हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन  जालींदर जाधव यांनी केले नियोजन जत शाखा प्रमुख  जोतिबा गोरे, संभाजी साळे,चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, संज्योती साळुंखे, शिवाजी जाधव, संजय साळुंखे, यांचेसह सेवादल युनिट क्रमांक ११६१मधील सर्व सेवादार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

No comments:

Post a Comment