जत येथे सध्या अस्तित्वात असलेले बसस्थानक लहान व जुने असून प्रवाशांच्या गैरसोयीचे आहे. त्यामुळे सोलनकार चौकाशेजारी असलेल्या महामंडळाच्या जागेत नव्याने अद्ययावत बसस्थानक मंजूर करून बांधावे, अशी आमदार विलासराव जगताप यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यामधील जत तालुका हा मोठ्या लोकसंख्येचा तालुका आहे. सदरचा तालुका महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे येथे कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संपर्क असतो.
जत शहर हे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. सध्या उपलब्ध असणारे बसस्थानक लहान व जुने झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. जतमध्येच सोलनकर चौक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्वतःच्या मालकीची 2.81 हेक्टर.आर इतकी खुली जागा उपलब्ध आहे. सदर जागेच्या दोन्ही बाजूनी विजापूर-सातारा राष्ट्रीय महामार्ग व जत-सांगोला राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यामुळे वाहतुकीसाठी सोयीचे होणार आहे. सदर ठिकाणी अद्यावत बसस्थानक व्हावे अशी मागणी नागरिकांतून होत असल्याने सोलनकार चौक परिसरात नवीन बसस्थानक (बसपोर्ट) बांधण्यास मंजुरी मिळावी,असे आमदार जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment