Thursday, June 13, 2019

शिक्षकांच्या मागण्यांबाबत जतला निवेदन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका शिक्षक भारती संघटनेने गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने यांची भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. त्यांनी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली आहे.

 तालुक्यातील अंशदान पेन्शन निवृत्ती योजनाधारक (डीसीपीएस) शिक्षकांचा १ जानेवारी २०१६ ते ३१
डिसेंबर २०१८ मधील ७ व्या वेतन-आयोगातील पहिला हप्ता १ जुलैला देण्यात यावा, मे-जून २०१० मध्ये उन्हाळी सुटीत ज्या शिक्षकांनी जनगणनेचे काम केले आहे, त्यांना शासन निर्णयानुसार त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात त्यांनी जेवढे दिवस काम केले असेल, तेवढ्या दिवसांची रजा जमा करावी, शिक्षकांचे २०१७-
१८ व २०१८-१९ या दोन वर्षातील गोपनीय अहवाल मिळावेत, आयकरचे १६ नंबर फॉर्म मिळाले नसून ते लवकर मिळावेत, शिक्षकांची वैद्यकीय, वेतन फरक, वरिष्ठ वेतनश्रेणी फरक व अन्य प्रकारची बिले अदा करण्यात यावीत, यांसह विविध मागण्या निवेदनात
करण्यात आल्या आहेत.
 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मल्लया नंदगाव, नवनाथ संकपाळ, तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत, सरचिटणीस
शौकत नदाफ, बाळासाहेब सोलनकर, जितेंद्र बोराडे, अविनाश सुतार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment