Wednesday, June 19, 2019

जत तालुक्यातील गायब ग्राम सेवकाचे निलंबन


जत,(प्रतिनिधी)-
 गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता, कामावर गैरहजर असणार्या साळमळगेवाडी (ता. जत) येथील ग्रामसेवक श्रीहरी माने यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामसेवक माने कामावर गैरहजर आहेत. त्यांना पंचायत समिती स्तरावरून गट विकास अधिकार्यांनी नोटिसा दिल्या, मात्र तरीदेखील ते कामावर हजर झाले नाहीत. त्यानंतर गटविकास अधिकार्यांनी ग्रामसेवक माने यांचा अहवाल ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांना सादर केला. या अहवालाची चौकशी केल्यानंतर सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी श्रीहरी माने यांच्या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केली.

No comments:

Post a Comment