Wednesday, June 26, 2019

कर्नाटक सीमेवरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील रस्त्यांची अवस्था फारच बिकट झाली असून वर्षानुवर्षे हे रस्ते सुधारलेले नाहीत. कर्नाटकने मात्र सीमेपर्यंत रस्ते सुधारले आहेत.राज्यातील रस्ते कधी सुधारणार असा सवाल करत राज्याचे ग्रामविकास मंत्रालय यांच्याकडे रस्ते सुधारणेबाबतच्या मागणीचे निवेदन जत तालुका विकास मंचच्यावतीने  देण्यात आले आहे.

    सांगली जिल्हातील जत तालुक्याला तिन्हीही बाजुने कर्नाटक राज्याची सीमा आहे .जत तालुक्यातुन कर्नाटकात जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था फार बिकट आहे .या रस्त्याची वर्षानुवर्षे दुरूस्ती नाही .त्या तुलनेने उशिरा का होईना पण कर्नाटक शासनाने त्यांच्या हद्दीपर्यंत तरी रस्ते दुरूस्त करून पांढरे पट्टे,दोन्ही कडेने रेडीअम बाॕक्स लावुन चकचकीत डांबरी रस्ते केले आहेत आणि महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत  मात्र अजुनही उजाड माळराणावरती असणारे खड्डेमय कच्चे रस्ते पाहायला मिळत असल्याने  आपल्या हा प्रदेश अफगानिस्तान आणि भुटान सारख्या पूर्णपणे अविकिसीत देशाचा भाग असल्याचा नागरिकांना दिसत आहे.
जत या तालुक्याची अनेक गावांना कर्नाटकातील राज्यांची सीमा लागलेली आहे .यातील गिरगाव, बालगाव, को.बोबलाद, सिध्दनाथ, कागनरी, दरिबडची, एंकुडी,उमराणी,सिंदुर,सुसलाद आणि सोनलगी या गावांना कर्नाटक राज्याची सिमा आहे पण जवळपास या गावातून कन्नूर,इंचगिरी,जिगजेवनी,कोट्टलगी,बाळगेरी, अनंतपूर, कलमडी, गोनसागी,हुबनुर, यत्नाळ, शिरनाळ, निंबर्गी या गावांना जोडणाऱ्या सर्वच रस्त्याची वर्षानुवर्षे  दैनाच झालेली पाहायला मिळते.जत तालुक्यातील कर्नाटक राज्यात जाणाऱ्या  पण महाराष्ट्र हद्दीपर्यतचे रस्ते कच्चे आणि खड्डेमय आहेत . त्यातील काही गावांना जोडणारे लहान कच्चे रस्ते तर खड्डे आणि बल्लारी वनस्पतींच्या झुडूपांनी दोन्हीही बाजुने घेरलेले आहेत .या भागातील वाड्या वस्त्यामध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांचे खराब रस्त्यामुळे रात्री -अपरात्री आणि विशेषतः तात्काळ गरजेच्या काळात हाल अपेष्टा सतत सामोरे जावे लागत आहेत.
मतदान कमी म्हणून दुर्लक्ष ?
सीमा भागात  वाड्या-वस्त्यावर लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे .त्यामुळे येथील मतदान संख्या सुद्धा कमीच आहे .या भागाला जोडणारे रस्ते हे कर्नाटकात जात असल्याने त्याचा  महाराष्ट्राला म्हणावा तितका उपयोग नाही ,असा समज केला आहे कि काय ? लोकप्रतिनीधी आणि शासनाच्या मनात असा प्रश्न निर्माण होत आहे .त्यामुळेच या रस्त्याकडे सतत दुर्लक्ष होत असुन याचकारणाने अजून हे रस्ते डांबरीकरणापासुन वंचित आहेत.
कर्नाटकातील कोट्टलगी आणि कलमडी येथे दर्जेदार रस्ते बनले आहेत. शेजारीच असणाऱ्या  कर्नाटकातील कोट्टलगी आणि कलमडी या गावातून महाराष्ट्र हद्दी पर्यत अत्यंत दर्जेदार चांगले रस्ते आहेत आणि रस्ते पुढे मुचंडी आणि दरिबडची येथे जोडले आहेत  पण येथे केवळ अनेक वर्षापासून जुजबी मुरूमीकरण अर्धवट डांबरिकरण अथवा खड्डे भरण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जात असतात.
दरम्यान यामुळे प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतुक संकटात सापडली आहे. खराब रस्त्यामुळे वाहने लवकर कामाला येत आहेत. जत पूर्व  आणि दक्षिण भागाला अथणी, विजापूर आणि चडचण ही कर्नाटकातील शहरे जत आणि  सांगली या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या शहरापेक्षा अगदी जवळ म्हणजे शेजारी असल्यासारखे आहेत. त्यामुळे या भागातील मालवाहतुक आणि  नागरिकांचे येणे-जाणे  कर्नाटकातच असते.पण खराब रस्त्यामुळे या वाहनाबरोबर दुचाकीस्वारांना प्रचंड धुरळ्यांचा आणि खड्डाचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या कायमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची  आवश्यकता आहे.  हे रस्ते प्रामुख्याने महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात हद्दीत विभागलेले असल्याने दोन्ही बाजूने एकदाचा निधी मिळण्यास प्रशासकीय अडचणी येतात. त्यामुळे हे सर्वच रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाअंतर्गत समाविष्ट केल्यास  या रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून संपूर्ण निधी मिळून या दोन्हीही राज्यातील सीमेवरील रस्ते पूर्ण होवू शकतात.

सीमेवरील रस्त्यांसाठी पाठपुरावा
महाराष्ट्र -कर्नाटक हद्दीवरील जत तालुक्यातील 38 रस्त्यांचा पंतप्रधान ग्रामसडक योजना आंर्तगत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालय आणि स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे --नजिर नदाफ,जतकर विकास मंच 

महाराष्ट्र -कर्नाटक हद्दीवरील जत तालुक्यातील 38 रस्त्यांचा पंतप्रधान ग्रामसडक योजना आंर्तगत समाविष्ट करण्यासाठी मागणी केलेली रस्त्याची नावे*
1) व्रजवाड ते मलाबाद -9कि.मी.
2) सिंदुर ते कोहली-9  कि.मी.
3) उमराणी ते रामतिर्थ-8 कि.मी.
4) खोजानवाडी ते कोट्टलगी-9 कि.मी.
5) उमराणी ते कागनरी- 8.5 कि.मी.
6) रावळगुंडवाडी ते कोट्टलगी -5 कि.मी.
 7) उमराणी ते कोट्टलगी- 5 कि.मी
8) सिंदूर ते अदहळ्ळी-13 कि.मी
9) उमराणी ते बेडरहट्टी-12 कि.मी
10) ऐकुंडी ते अनंतपूर-4 कि.मी
11) सिध्दनाथ ते कनमडी-10 कि.मी
12) सिध्दनाथ ते अंगिनाळ-5 कि.मी.
13).सिध्दनाथ-गोनसगी-8.5 कि.मी
14) दरिबडची-गोनसगी-11 कि.मी
15) पांढरेवाडी-आंगिनाल-6 कि.मी
16) आंसगी तु -गोनसंगी-6 कि.मी.
17) धुळकरवाडी-हबनूर-8  कि.मी
18) कागनरी-धनगरगी-12 कि.मी
19)कागनरी-यत्नाळ-4 कि.मी
20) तिकोंडी-यत्नाळ-6 कि.मी
21) को.बोबलाद-यत्नाळ-10 कि.मी.
22)को.बोबलाद-शिरनाळ-5 कि.मी.
23)को.बोबलाद-कन्नुर-12 कि.मी
24)गुलगुंजनाळ-कन्नुर- 4 कि.मी.
25) जाल्याळ बु-मडसनाळ-6 कि.मी.
26) मानिकनाळ-कानकनाळ-3  कि.मी.
27) बालगाव-कानकनाळ-12 कि.मी.
28)बालगाव-कात्राळ-10 कि.मी.
29) बोर्गी खु-कात्राळ-3 कि.मी.
30)बोर्गी खु-लमाणहट्टी-3 कि.मी.
31)बालगाव-जिगजेवणी-10 कि.मी
32) सुसलाद-जिगजेवणी-10  कि.मी
33)सुसलाद-निंबर्गी-6.5 कि.मी.
34)सोनलगी-कोकंणगाव-5 कि.मी
35) सोनलगी-जीरेअंकलगी-5 कि.मी.
36) सोनलगी-निंबर्गी-6 कि.मी
37)गिरगाव-कन्नुर-14 कि.मी.
38) गिरगाव-इंचगिरी-5 कि.मी.

No comments:

Post a Comment