जत,(प्रतिनिधी)-
' ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ' राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राज्य व केंद्रीय पदाधिकारी आणि पत्रकार सदस्यांची संयुक्त बैठक नुकतीच कोल्हापूर शहरातील ज्योतिबा हॉटेल च्या सभागृहात पार पडली. १५ वे वार्षिक पत्रकार संमेलन भरवणे संदर्भात शहर, ठिकाण व वेळ निश्चित करण्या साठी बोलावण्यात अली होती. सभेला रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर येथील पत्रकारानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. या सभेच्या अध्यक्षस्थानी एजेएफसीचे केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल होते. यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश कदम,राज्य संपर्क प्रमुख मकरंद भागवत,केंद्रीय सचिव गणेश गोडसे, खजिनदार नितीन भगवान यांनी यावेळी सभेस मार्गदर्शन केले.
संघटनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा गंभीर इशारा सतीश कदम यांनी यावेळी दिला व तसेच अनेक नवीन निवडी जाहीर करण्यात आल्या .
या सभेत बोलताना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून तो सतत प्रयत्नशील असतो.चांगल्या कामांची जशी प्रसिध्दी तो देतो तशीच ज्या ठिकाणी अन्याय होईल, त्याचीही देतो.पण ज्याने अन्याय केला त्याच्या विरोधात ती बातमी असल्याने ती व्यक्ती पत्रकारांवर भ्याड हल्ले करते.अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.आता आपण पत्रकार म्हणून समाजाला दिशा देण्यासाठी व समाजाला जागृत करण्यासाठी अविरत काम करत असतो .त्या समाजाने देखील हल्ले ,खोटे गुन्हे,दाखल होणाऱ्या पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. तरच हा समाजाला दिशा देणारा चौथा स्तंभ शाबूत राहील व समाजाला योग्य ती दिशा मिळेल.
पत्रकरांच्या समस्या निवारण करण्यासाठी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल संपूर्ण महाराष्ट्रात च नव्हे तर देशभरातील सात-आठ राज्यात आपले नेटवर्क मोठ्या जोमाने उभारलेले आहे.येणाऱ्या कांही काळात देशाच्या प्रत्येक राज्यात कार्यरत राहील, असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला. सध्याच्या स्थितीत संघटना इतकी मजबुत झाली आहे की एखाद्या पत्रकारावर जर या पुढच्या काळात हल्ला झाला तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. शासनानेही पत्रकारांच्या समस्येची गंभीर दखल घेण्यासाठी आता ही संघटना पुढाकार घेईल.आजकाल पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्याची सत्यता पडताळून योग्य ती चौकशी करूनच निर्णय घेण्याची गरज आहे .यासाठी शासनाचेही लक्ष वेधणार आहे .व असणाऱ्या त्रुटी लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
ही संघटना केवळ पत्रकारांच्या न्याय हक्कसाठीच आपल्या जीवाचे रान करून पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. यासाठी राज्यातील या संघटनेचे सर्व पदाधिकारी व प्रादेश अध्यक्ष या नात्याने मी स्वतः पत्रकारांच्या हितसौंरक्षण जपण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन. आपली एकजूट आपली ताकद अबाधित ठेवून निरपेक्ष भावनेने प्रामाणिकपणे सर्वांनी एकत्रित येऊन काम करू व यापुढे आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभा करू असे प्रखर मत सतीश कदम यांनी व्यक्त केले .
या सभेत मिरजेचे अब्दुलभाई शेख पत्रकारांचे व्यथा मांडून,पत्रकारांना ग्रहनिर्माणसाठी जागा उपलब्ध करून द्यावे,पेन्शन योजना लागू करावे व तसेच जाचक अटी रद्द करून कार्यरत असणाऱ्या सर्व पत्रकारांना अधिस्वीकृपत्र प्रदान करावे व प्रवासादरम्यानचे महामार्गा वरील टोल माफ करणे, संबंधीेच्या मागण्या चर्चेत आणले. लवकरच युट्यूब चॅनेल वरील पत्रकारांसाठी स्वतंत्र समिती एजेएफसी अंतर्गत तयार करून त्यांनाही मुख्य प्रवाहात घेणे विषयी निर्णय घेण्यात आला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या व पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवण्यात आली. विवेक म्हमाणे पाटील यांची ए जे एफ सी पूरस्कृत ' पत्रकार संघर्ष दल ' प्रमूख पदी नियुक्ती पत्र देऊन निवड केली.
राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमी वर दि.16 नोव्हेंबर 2019 रोजी वाई किंवा महाबळेश्वर येथे ajfc चे पत्रकार संम्मेलन घेण्यावर साखोल चर्चा करण्यात आली.नव्याने सभासदत्वासाठी ajfcindia.@redifmail.com कींवा मोबाईल क्रमांक .८८८८४७७६४५ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले या वेळी एजेएफसी चे जुल्फिकार काझी,राजेंद्र शिंदे,दिपक शिंदे, शेखर घोंगडे,नजीरभाई चट्टरकी,राजेश पाटील,गोपाळ पाथरूट,बाबासाहेब सपकाळ आदी उपस्थित होते.
खूप छान अभिनंदन हम्म सब एक है, शेखर धोंगडे, जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर ajfc
ReplyDeleteखूप छान मांडणी ! ajfc राष्ट्रीय पत्रकार संघटन तर्फे आपल्या Utub chanel ला शुभेच्छा ! केंद्रीय अध्यक्ष
ReplyDelete