राज्यातील ५३.५ टक्के पुरुष तर ४२.५ टक्के महिला अविवाहित असल्याचे आर्थिक सर्वेक्षण २0१८च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्यातील अविवाहित पुरुषांचे आणि महिलांचे प्रमाण कमी आहे. स्थलांतर, बेरोजगारी, बदलती जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे अविवाहितांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
अर्थसंकल्प सादर करण्याआधी २0१८च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात राज्यातील अविवाहित पुरुष आणि महिलांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात आज ५४.४ टक्के पुरुष, तर ४४.८ टक्के महिला अविवाहित आहेत. या तुलनेत राज्यातील अविवाहितांचे प्रमाण कमी आहे. वाढती स्थलांतर, प्रदीर्घ काळ चालणारे शिक्षण, बेरोजगारी ,कंत्राटी नोकर्या अशा अनेक कारणांमुळे अविवाहितांचे प्रमाण वाढल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातून शहरी भागात, एका राज्यातून दुसर्या राज्यांत होणार्या स्थलांतरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहेत. आर्थिक किंवा शैक्षणिक कारणांसाठी ही स्थलांतर केली जात असून याचा सरळ परिणाम विवाहसंस्थेवर होतो आहे.
स्थलांतरामुळे अनेक जण लग्न करत नाहीत. तसेच शिक्षण, कृषी संस्कृतीपासून दूर जाणे, नोकरीची जीवघेणी स्पर्धा या सगळ्यामुळे तरुण पिढीचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे, असे मत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथील प्राध्यापक डॉ. विभूती पटेल यांनी व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment