Friday, June 28, 2019

उमदीत पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जत,(प्रतिनिधी)-
उमदी (ता. जत) येथील उमदी ग्रामीण बिगरशेती सहकारी या पतसंस्थेकडून महात्मा विद्यामंदिर व ज्यु. कॉलेजच्या शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
महात्मा विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज उमदी येथे उमदी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित उमदी यांच्यावतीने वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पाचवी ते दहावी वर्गात सर्वप्रथम येणा-या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी बारा वह्या वाटप करण्यात आल्या. महात्मा विद्यामंदिर येथे पाचवी ते दहावी असे एकूण २५ वर्ग आहेत. प्रत्येक वर्गातील तीन प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक व तीसरा क्रमांक घेणा-या प्रत्येकी एका विद्याथ्र्याला १२ वह्या वाटप केल्या.

पतसंस्थेचे उपाध्यक्ष महादेवप्पा होर्ती म्हणाले, यापुढे दरवर्षी ५ वी ते १० वी वर्गात पहील्या तीन क्रमांकातील विद्यार्थ्यांना १२ वह्या पतसंस्थेकडून देणार आहेत. सभासदांच्या हितांचे निर्णय घेत सर्व सभासदांचा विमा उतरवण्यात आला असून यापुढे शैक्षणिक क्षेत्रातील मागास दुर्बल घटकांना यापुढील कालावधीत पतसंस्था मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष विष्णू निळे, मॅनेजर अरविंद सौदी, सर्वोदय शिक्षण संस्थचे उपाध्यक्ष रेवणाप्पा लोणी, सचिव एस. के. होर्तीकर, संचालक पिरसाब जमादार, माजी. जि. प. सदस्य अॅड. चन्नापा होर्तीकर, कलापा शिरगट्टी, पर्यवेक्षक रमेश खरोशी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीशैल मालापुरे यांनी, तर आभार राजशेखर धायगुडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment