जत , (प्रतिनिधी)-
कुंभारी (ता. जत) येथील सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी समाधान विठ्ठल चव्हाण (वय 25, रा. कुंभारी) याच्या विरोधात जत पोलिस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी 4.30 वाजता पिडीत मुलीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत माझ्याशी लग्न कर नाहीतर गावात तुझी बदनामी करतो, अशी धमकी दिली व तिच्याशी झोंबाझोंबी करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत पिडीत मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांच्या कानावर घातला. घरच्यांनी जत पोलिस ठाणे गाठत समाधान याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगाचा व पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नव्हती. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब कत्ते करत आहेत.
No comments:
Post a Comment