Wednesday, June 19, 2019

कु.प्रांजली चव्हाणचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेण्यात येणारी 'पूर्व उच्च प्राथमिक(इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक(इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०१८-२०१९' गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये डफळापूर (ता.जत) येथील जि. प. मुलींची शाळा नं.2 ची  विद्यार्थिनी  कु. प्रांजली अभिजित चव्हाण ही जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवत गुणवंत शाळेच्या शिरपेचात आणखी एक उज्वल यशाचा मनाचा तुरा रोवत सलग चौथ्या वर्षी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

  यशस्वी मुलींचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने, शिक्षण विस्ताराधिकारी रघुनाथ शिंदे व तानाजी गवारी, केंद्राचे केंद्र प्रमुख शंकर बेले, मुख्याधिपिका रेखा कोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोटू शिंदे,उपाध्यक्ष हणमंत कोळी यांनी कौतूक केले.उदयोगरत्न संकपाळ, अजेंता लोंढे,शंकर कुंभार, जयश्री मगदूम,आरती कांबळे, मनीषा शिंत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

1 comment: