Monday, June 10, 2019

'सीएचबी' प्राध्यापकांचे भवितव्य अंधकारमय

जत,(प्रतिनिधी)-
राज्य सरकारने तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात ३०० रुपयांवरून ५०० रुपये वाढ केली आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाची मान्यता घ्यावी लागणार आहे. शिवाय शिक्षण सहसंचालकांकडून ना हरकत दाखला बंधनकारक आहे. पूर्वी एका पूर्णवेळ रिक्त
पदासाठी तीन सीएचबी धारकांची नियुक्ती केली
जात होती. नव्या नियमानुसार त्या जागी आत  केवळ दोन सीएचबीधारक नेमण्यात येणार आहेत.  नवीन नियमांच्या कचाट्यात सीएचबीधारक अडकल्याने त्यांचे भवितव्य अंध:कारमय आहे.

जिल्ह्यातील ३९ महाविद्यालयांमध्ये जवळपास  पावणेसातशे सीएचबीधारक कार्यरत आहेत. यामध्ये नेट, सेट, पीएच.डी. केलेल्यांचाही समावेश आहे. दरवर्षी निवृत्त होणारे प्राध्यापक, विद्यापीठांच्या सूचना, नवीन नियम, अतिरिक्त काम, नोकरीची धास्ती यामुळे सीएचबी धारकांमध्ये तणाव वाढत आहे. आज ना उद्या आपण कायम होऊ या एकाच आशेवर शेकडो  सीएचबी धारक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. त्यांना मिळणाच्या तुटपुंज्या मानधनात वाढ झाली - असली तरी त्यासाठी अनेक नियम, अटी घालण्यात आल्या आहेत. शासनाच्या नव्या नियमानुसार सीएचबीधारकांना आता एकाच महाविद्यालयात काम करण्याबाबतचे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक  सीएचबी धारकांचे भवितव्य अंधारात झळ बसणार आहे.
शासनाने नोव्हेंबर २०१८ पासून सीएचबी धारकांच्या मानधनात वाढ केली. मात्र, त्यांचे मानधन जुन्या पध्दतीने काढायचे का, नव्या पध्दतीने काढायचे? या संभ्रमात शासकीय यंत्रणा अडकल्याने सीएचबी धारकांना नोव्हेंबरपासून मानधन मिळाले नाही.
त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सीएचबी धारकांना मिळणारे मानधन प्रत्येक महिन्याला थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे अशी मागणी होत आहे. नव्या नियमांमुळे सीएचबी धारकांच्या नियुक्त्यांमध्ये अडचणी येणार असल्याची शक्यता आहे. सीएचबी नियुक्तीसाठी महाविद्यालयाने जाहिरात देण्यापूर्वी विद्यापीठाची मान्यता घ्यावी लागणार आहे. विद्यापीठाने मान्यता दिल्याचे पत्र शिक्षण
सहसंचालक कार्यालयाकडे सादर करावयाचे आहे. या कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. पूर्वी या नियुक्त्या प्राचार्यांच्या अधिकाराखाली होत होत्या. मात्र, नव्या नियमानुसार यावर बंधने आली आहेत.सन २०१४ पासून कायमस्वरुपी प्राध्यापकांची भरती थांबली होती. त्यानंतर मात्र, शासनाने ४० टक्के भरतीचे आदेश दिले. ही प्रक्रियाही संथगतीने पार पडत आहे. त्यामुळे उच्चशिक्षित पात्र सीएचबी धारकांना अडचणी येत आहेत. जर भरती प्रक्रिया शंभर टक्के राबवली गेली तर सीएचबी धारकांना त्याचा निश्चितच लाभ होईल.
सीएचबी धारकांचे नवे मानधन
* कला, वाणिज्य, विज्ञान शाखा ५०० रुपये (पूर्वी ३०० रुपये)
* कला, वाणिज्य, विज्ञान पदव्युत्तर ६०० रुपये (पूर्वी ३०० रुपये)
* शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम ६०० रुपये (पूर्वी ३०० रुपये)
* प्रात्यक्षिक- प्रती तास २०० रुपये (पूर्वी १५० रुपये)

No comments:

Post a Comment