Monday, June 17, 2019

जत शहरातील डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

जत,( प्रतिनिधी)-
 कोलकात्यामध्ये दोन दिवसांपूर्वी रूग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद आता सर्वदुर उमटू लागले असून,देशभरातील डॉक्टरांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी जत येथील 'इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेने आज सोमवार 17 जून रोजी काम  बंद आंदोलन पुकारुन मोर्चाने जत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

आपतकालीन वैद्यकीय सेवा वगळता तालुक्यातील सर्व वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. रोहन मनोहर मोदी यांनी दिली.याबाबतचे निवेदन जतचे तहसिलदार सचिन पाटील यांना देण्यात आले. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरामध्ये गत आठवड्यात रूग्णालयात उपचार घेणा-या एकत्र रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड करन डॉक्टरांवर हल्ला केला होता. सदर घटनेने पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. डॉक्टर हा समाज जीवनातील महत्वाचा घटक असून आपल्या रुग्णाप्रती जागृतही असतो. परंतु कधी कधी
त्यांच्या अथक प्रयत्नानंतर रूग्णांचा जीव  वाचविण्यात त्यांना यश येत नाही. रूग्ण दगावल्यानंतर त्यांचे नातेवाईक डॉक्टरांना दोषी धरून त्यांना नाहक मारहाण करतात. कोलकत्ता हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
डॉक्टरांवर दिवसागणिक वाढणारे हल्ले थांबविण्यासाठी सरकारने कायदा करावा अशी मागणी वारंवार डाँक्टरांच्या संघटनेकडून करण्यात येत असली तरी, शासनाने अद्यापही या मागणीची गांभिर्याने दखल घेतली असल्याचे दिसून येत नाही. कोलकाता येथील घटनेमुळे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉटरांच्या संघटनेने पुन्हा एकदा रूग्णालयात हिंसाचार करणा-यांना किमान सात वर्षांचा तुरुंगवास देणारा कायदा करावा, व दोषींवर कठोर कारवाई करावी यामागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला जत तालुका लबोरेटरी संघटनेनेही आम्हाला पाठींबा दिला आहे. यावेळी डॉ. रविंद्र आरळी, डॉ.विजय पाटील, डॉ. देवानंद वाघ, डॉ. मनोहर मोदी, डॉ. सोमशेखर मोदी, डॉ. पराग पवार, डॉ. शरद पवार, डॉ. मल्लिकार्जुन काळगी, डॉ. शंकर तंगडी, डॉ. नयनतारा बिजरगी, शालिवाहन पट्टणशेट्टी, डॉ.सी.बी.पवार, डॉ. राजाराम गुरव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment