जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी जत पूर्व भागातील शेतक-यांनी संख ते मुंबई पायी दिंडी सुरू केली आहे. ही दिंडी सोमवारी सांगलीत दाखल झाली.या दिंडीत बसवराज आलगुर महाराज यांनी सहभागी होत पाठिंबा व्यक्त केला. ही पायी दिंडी मंत्रालयावर २० जूनला धडक मारणार असून मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देऊन चर्चा करणार आहे.
संत सयाजी बागडे महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या जत
पूर्व भागातील गावांतील शेतकयांची पायी दिंडी संख ते मुंबई अशी सुरू झाली आहे. या दिंडीचे नेतृत्व तुकारामबाबा महाराज यांनी करीत आहे. जत येथील भाग्यवंती देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष बसवराज आलगुर महाराज यांनी देवस्थानच्या वतीने या दिंडीत सहभागी होत पाठिंबा व्यक्त केला.
No comments:
Post a Comment