Saturday, June 29, 2019

निरंकारी मंडळाच्या शिबिरात 112 जणांचे रक्तदान

जत,(प्रतिनिधी)-
संत निरंकारी चँरिटेबल फौडेशनच्या जत शाखेच्या वतीने साई प्रकाश मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 112  रक्तदात्यानी सहभाग घेतला.
      या शिबिराचे उद्घाटन सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे व पंचायत समिती जतच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना जमदाडे म्हणाले की, संत निरंकारी मिशन हे आध्यात्माबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महान कार्य करीत आहे सर्वांनी याची शिकवण अंगिकारणे गरजेचे आहे सौ.वाघमळे मँडम म्हणाल्या की जत सारख्या दुर्गम भागांमध्ये मिशनचे वृक्षलागवड,स्वच्छता अभियान, सामुहिक विवाह, रक्तदान शिबिर यासारखे समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत याची आज समाजाला गरज आहे. या महान कार्याला शुभेच्छा दिल्या. संचलन प्रकाश माने यांनी केले आभार जत जोतिबा गोरे यांनी केले.
नियोजन  सेवादल विभागाचे प्रमुख संभाजी साळे,संज्योती साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत (पापा) कुंभार,माजी नगरसेवक गिरमल कांबळे,सुभाष माने ,संजय साळुंखे, जालिंदर सांगोलकर,अशोक माळी, शिवाजी जाधव सह सर्व सेवादार महापुरुष यांनी केले.

No comments:

Post a Comment