जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत
समितीकडील कर्मचारी दीपक बर्गे याच्या आत्महत्येप्रकरणी बीडीओ अर्चना वाघमळे यांच्या
चौकशीचा अहवाल चौकशी समितीने सीईओ अभिजित राऊत यांच्याकडे सादर करण्यात आला.
अहवालाची माहीती घेऊन हा अहवाल दोन दिवसात शासनास पाठविला जाईल असे सीईओ
श्री राऊत यांनी स्पष्ट केले.
तीन महिन्यांपूर्वी
जत पंचायत समितीत सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असणार्या
बर्गे या लिपिकाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी सीईओ श्री.
राऊत यांनी अतिरिक्त सीईओ विक्रांत बगाडे, सामान्य
प्रशासनाचे डेप्यु. सीईओ निलेश घुले, डेप्यु.
सीईओ दीपाली पाटील, पशुसंवर्धन विभागाकडील डॉ.
गावीत यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या
प्रकरणी चौकशी समितीने गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे आणि पंचायत समितीकडील कर्मचार्यांचे जबाब घेतले आहेत. समितीने संपूर्ण माहिती घेऊन
काल आपला अहवाल राऊत यांना सादर केला. दोन दिवसांत हा अहवाल शासनास
पाठवला जाईल, असे श्री राऊत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment