Wednesday, June 26, 2019

एकुंडी येथे नेत्र तपासणी शिबीर

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील एकुंडी येथे ग्रामपंचायत व लायन्स नॕब नेत्र रूग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबीर पार पडले.

या शिबिराचे उद्धघाटन सरपंच बसवराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.  यावेळी लायन्सचे डॉक्टर, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एकुंडी परिसरातील 200 रुग्णांनी लाभ घेतला. यापैकी 35 रुग्णांचे मोतीबिंदू आॅपरेशन करणे गरजेचे असल्याचे आढळून आले. सांगली येथील लायन्स नेत्र रुग्णालय येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून येण्या-जाण्याची व राहण्याची मोफत व्यवस्था आहे. तसेच 200 रुग्णांना प्रथमोपचार म्हणून औषधे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम अखिल भारतीय सरपंच परिषद व ग्रामपंचायत एकुंडी यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी उपसरपंच सरोजनी कोरे, सुरेश चौगुले, मलगोंडा हेळकर, मलगोंडा नाईक, सुरेश शेगणे, सदाशिव शेगावे, अनिल गुड्डोडगी, हणमंत गुड्डोडगी, अंगणवाडी सेविका ललिता नाईक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment