जत,(प्रतिनिधी)-
चेन्नई येथील एका दुकानात गलाई कामगार म्हणून काम करीत असलेल्या एकाने आपल्या अन्य तीन साथीदारांसह 28 किलोची चांदी चोरून पोबारा केला होता. चेन्नई पोलीस आणि उमदी (ता.जत) येथील पोलिसांनी त्यातील एका आरोपीच्या लवंगा (ता.जत) घरावर छापा टाकून सुमारे चार लाखांची 10 किलोची चांदी ताब्यात घेतली,मात्र आरोपी मिळाला नाही.
लवंगा येथील महादेव सोमलिंग सारगर हा सेमबीयां (चेन्नई) येथील एका दुकानात गलाई कामगार म्हणून काम करत होता. त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांसह या दुकानातून 28 किलोची चांदी घेऊन पोबारा केला होता. चेन्नई पोलीस त्याचा शोध घेत येथे आले होते. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपविभागीय पोलीस अधीकारी (जत विभाग ) दिलीप जगदाळे याच्या मार्गदर्शनाखाली तसेच चेन्नईचे पोलीस पथक व उमदी पोलीस ठाणेकडील सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर ,पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे, भगवान कोळी , पोलीस कर्मचारी बामणे , पोलीस नाईक श्रीशैल वळसंग यांनी सेमबीयम पोलीस ठाणे, पेरामबुर -चेन्नई ( तमिळनाडू) यांच्याकडील गुन्ह्यातील आरोपी महादेव सोमलिंग सलगर (रा लवंगा ता जत ) यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी संशयीत आरोपी मिळून आला नाही,परंतु त्याने लपवून ठेवलेली सुमारे चार लाख किंमतीची 10 किलो चांदी मिळून आली. आरोपीचा शोध सुरू आहे.
No comments:
Post a Comment