Saturday, June 22, 2019

जतमध्ये सरपंच परिषदेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव


जत,(प्रतिनिधी)-
 जत येथे अखिल भारतीय सरपंच परिषद आयोजित सरपंच, उपसरपंच, सदस्यांची तालुका कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडग यांच्या अध्यक्षतेखाली व तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

 सरपंच संघटनेचे राज्याध्यक्ष जयंत पाटील (कुर्डूकर), उपाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, राज्य संघटक कैलास गोरे, संपूर्ण राज्य कार्यकारिणी टीम व राज्यातील सर्व सरपंच बांधवांनी मागणी केल्याप्रमाणे राज्य शासनाने सरपंच व सदस्यांच्या मानधनासाठी 200 कोटींची तरतूद केल्याने लहान-मोठ्या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना 5000 रुपये मानधन मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा आभाराचा ठराव संघटनेच्या वतीने मांडण्यात आला. सरपंच परिषेदेच्या वतीने सरपंच, उपसरपंच, सदस्यांची दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक घेण्याचे ठरले. ‘मनरेगाची कामे सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
चारा छावणीवर लक्ष देऊन शेतकर्याच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर उपाय करण्याचे ठरले. प्रधानमंत्री घरकुल योजनेला चालना देण्याबाबत, गावातील विकासकामांत येणार्या अडीअडचणींवर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांच्यात समन्वय साधण्याच्या अनुषंगाने गटविकास अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीसाठी बसवराज पाटील, जिल्हा संघटक नाना भोसले, उपाध्यक्ष हिंदूराव शेंडगे, संपर्कप्रमुख सुरेश कटरे, विद्या सावंत, कल्पना बुरुकले, मारुती पवार, मुचंडीचे सरपंच अशोक पाटील, बसर्गीचे सरपंच किशोर बामणे, कुंभारीचे सरपंच राजाराम जावीर, शिंगणापूरचे सरपंच अण्णाप्पा पांढरे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

No comments:

Post a Comment