Monday, June 24, 2019

लिंगायत समाजाचा आम. जगतापांना पाठींबा- बसवराज पाटील

जत,(प्रतिनिधी)-
आमदार विलासराव जगताप यांनी राजकारणामध्ये महाराजांच काय काम असे विधान एका सभेत केले होते त्यावरून लिंगायत समाजाची बदनामी केली म्हणून अनेक वृत्तपत्रामधून व चैनल वरून बातम्या आले. परंतु आमदार जगताप हे महाराज व साधू यांच्याबद्दल बोलले आहेत त्यांनी लिंगायत समाजाबद्दल ब्र शब्द काढले नाहीत. असे विधान सरपंच परीषेदेचे जत तालुका अध्यक्ष व बसवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.   

    ते पुढे म्हणाले आमदार जगताप हे लिंगायत समाजावर प्रेम करणारे आहेत म्हणून बसरगीचे तांवंशी यांना पंचायत समितीचे सभापती केले, उमराणीचे नामद यांना जिल्हा परिषद सदस्य केले, संखचे आर
 के. पाटील यांना सभापती केले. उटगीचे बसवराज बिराजदार यांनाही सभापती केले. यांच्यासह अनेक लिंगायत समाजातील लोकांना मोठ मोठे पदे दिली. जर लिंगायत समाजाबद्दल आमदार जगताप यांना द्वेष असता तर लिंगायत समाजाला पदे दिली असती का? असे प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे आम्ही बसवसेनेच्या व लिंगायत समाजाच्या वतीने आमदार जगताप यांना या विषयाबाबत पाठींबा जाहीर केला आहे.
ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी विकासाचे राजकारण करावे लिंगायत समाजाचा राजकारणात आपापल्या स्वार्थ साधण्यासाठी वापर करू नये.यावेळी उमराणीचे आप्पासाहेब नामद, बसरगीचे शिवापा तावंशी, सखंचे आर के पाटील, पापा कुंभार, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सुनिल भैया पवार, रासपचे भूषण काळगी, रवि शेगावे, सुरेश शेगुणशी, अजिंक्य राक्षे उपस्थित होते.

3 comments:

  1. Aamhala aamadara balala pahije saheb karan manaje navin chera aanala tar tyani kama karnasathi prayatna aani dadapad karate

    ReplyDelete
  2. Aamhala aamadara balala pahije saheb karan manaje navin chera aanala tar tyani kama karnasathi prayatna aani dadapad karate

    ReplyDelete
  3. Juna vekti kaama karayala talatala karate karan tyana tyancha kise bharane chalu hote durasara piridat samajun ghya jathacha lokano

    ReplyDelete