उमदी येथील समता आश्रमाशाळेचा 12 वी चा निकाल 94 टक्के
जत,(प्रतिनिधी)-
सर्वोदय शिक्षण संस्था उमदी संचलित समता माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनियर कॉलेजचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ९४ टक्के इतका लागला आहे .
प्रथम तिन आलेले विद्यार्थ्यी व त्याना मिळालेली टक्केवारी खालील प्रमाणे आहे . कला शाखेत विशेष यश संपादन केलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत प्रथम राजश्री नावी ८८ टक्के , द्वितीय जयश्री निंबर्गी ८५ टक्के , तृतीय मल्लिकार्जुन पुजारी ८४ टक्के याप्रमाणे आहेत.
विज्ञान शाखा प्रथम क्रमांक सिद्धया माडग्याळ ७५ टक्के , द्वितीय अमृता होर्ती ६९.८४ टक्के , तृतीय मारुती कोळी ६७.६१ टक्के याप्रमाणे आहेत. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी.एम. हलकुडे ,सहशिक्षक सुभाष होर्ती , प्रकाश चव्हाण , संस्थेचे चेअरमन आर.सी. होर्तीकर , व्हँईस चेअरमन रेवाप्पा लोणी , सचिव एस.के. होर्तीकर , सी.आर. बगली , पी.जी. जमादार यांनी मार्गदर्शन केले आहे.
एम व्ही हायस्कूलचा निकाल 97 टक्के
जत,(प्रतिनिधी)-
सर्वोदय शिक्षण संस्था संचलित एम व्ही हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदी येथील इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ९६.७८ टक्के इतका लागला आहे .विज्ञान व कला शाखेत प्रथम तिन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत .
विज्ञान शाखा प्रथम गजानन नडगेरी ८१.५३ टक्के , द्वितीय भौरम्मर माशाळ ७४.४६ टक्के , तृतीय प्रमोद बगली ७३.६९ टक्के
कला शाखा प्रथम विद्याराणी गुरव ८८ टक्के , द्वितीय रोहिणी पुजारी ८०.१५ टक्के ,तृतीय सुधाकर कांबळे ८४ .६१ टक्के याप्रमाणे आहेत.वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष आर.सी.होर्तीकर , सचिव एस.के.होर्तीकर,उपप्राचार्य डी.सी. बासरगाव ,उपमुख्याध्यापक एस.सी.जमादार , पर्यवेक्षक आर. एम . खरोशी, व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले आहे.
No comments:
Post a Comment