'ऍपल' कंपनीचे सीईओ टीम कुक सांगतात आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी. अतिशय प्रेरणादायी अशा या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगाच्या आहेत. तर जाणून घेऊ या, नऊ महत्त्वाच्या गोष्टी!
1) निर्माते व्हा!: तुम्ही असे काम करून जा, जे तुमच्या मृत्यूनंतर मोठ्या काळानंतरही त्याचा प्रभाव कायम ठेवेल. निर्मात्यांचा कायमच असा विश्वास असतो, की त्यांनी केलेले काम एक दिवस त्यांच्यापेक्षा इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठे होणार आहे. आपले काम येणाच्या अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकेल, असा विश्वास त्यांना असतो. असे घडणे हा अपघात नसतो, तर हे घडणे हाच मुख्य मुद्दा असतो.
2) मेंटॉर "तयार' करीत नाही: तयारी करणे आणि तयार होणे, यात मोठा फरक आहे. हा धडा मी "ऍपल'चे माजी प्रमुख स्टीव्ह जॉब्ज यांच्या 2011 मध्ये झालेल्या मृत्यूनंतर शिकलो. जेव्हा जॉब्ज गेले, आपल्यातून खरोखर निघून गेले तेव्हाच मला तयारी करणे आणि तयार असणे, या दोन शब्दांतील खरा भेद समजला आणि सर्व धुरळा खाली बसल्यानंतरच मला माझ्यातील सर्वोत्तम द्यावे लागणार असल्याची जाणीव झाली.
3) दुस-याचे आयुष्य जगण्यात स्वतःचा वेळ दवडू नका: टीव्ह जॉब्स 14 वर्षांपूर्वीच सांगून गेले होते, "तुमच्याकडे मर्यादित वेळ आहे. तो दुस-याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका." माझे म्हणणेही आहे, की तुमच्या आधी येथे येऊन गेलेल्या व शक्य नसलेल्या आकारात बसू पाहणाच्या लोकांचे अनुकरण करू नका. एखादी गोष्ट निर्माण करण्यासाठी, तिला आकार देण्यासाठी बौद्धिक कौशल्ये पणाला लावावी लागतात. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ तुमच्या विचारांची पुनर्माडणी करण्यात वाया घालवाल आणि या काळात तुम्ही कोणालाही मूर्ख बनवू शकणार नाही.
4) प्रतिष्ठा हवी असल्यास जबाबदारी घ्या : पदवीधारकांनो, तुमच्या चुकांपासून शिका. तुम्हाला प्रतिष्ठा हवी असल्यास जबाबदारी घेण्याला पर्याय नाही. दुस-यांची माहिती चोरून वापरणे, खासगी आयुष्यात डोकावणे, फेक न्यूज पसरविणे, दुस-याचा तिरस्कार करणारी भाषणे ठोकणे, यातून खोटे चमत्कार घडविण्याच्या मागे लागू नका.
5) कष्टाला पर्याय नाही : तुम्ही तुम्हाला आवडते तेच काम केल्यास तुम्ही आयुष्यभरात एक दिवसही काम केले नसेल, या आशयाची एक म्हण आहे. मात्र, "ऍपल'मध्ये काम करताना हे पूर्णपणे असत्य
असल्याचे मी शिकलो. तुम्ही शक्य आहे त्यापेक्षा खूप
अधिक कष्ट करा. त्यातून तुमच्या हातातील हत्यारे तुम्हाला थोडी हलकी वाटतील, यापेक्षा जास्त काही नाही.
6) भव्य निर्मितीसाठी धोका पत्करा: तुम्ही आयुष्यात हवे ते करा. मात्र, ते करताना सावध राहण्याची चूक अजिबात करू नका. तुम्हा एका जागी ठामपणे उभे राहिल्याने तुमच्या खालील जमीन अजिबात सरकणार नाही, या भ्रमात राहू नका. एकच एक स्थिती कधीच कायम राहत नाही. त्यामुळे कामावर जाताना काही तरी अधिक चांगली निर्मिती करण्याचा विचार डोक्यात
घेऊनच जा.
7) गोष्टींकडे वेगळ्या चष्म्यातून पाहा :तुमचे डोळे कायम उघडे ठेवा, गोष्टींकडे वेगळ्या नजरेतून, वेगळ्या चष्म्यातून पाहायला शिका. काहीही (विपरीत)
ऐकण्यासाठी धैर्य गोळा करा. तुम्हाला माहीत असलेल्या, तुमचा विश्वास असलेल्या किंवा तुम्हाला आवडणाच्या गोष्टीच जवळ करण्यापेक्षा त्यांना दूर ढकलायला शिका. गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यासच तुमच्या हातून काहीतरी क्रांतिकारी घडेल. एखादा विचार फक्त कानावर पडू देऊ नका, तो "ऐकायला शिका. फक्त एकट्याने काम करू नका, एकत्र येऊन समस्यांना सामोरे जा.
8) प्रेरणादायी कामातून चांगल्या विश्वाची निर्मिती करा:
या प्रश्नांना भिडणे कधीच सोपे नसते. पण, या प्रश्नांना थेट भिडा. पर्यावरणातील बदलांपासून स्थलांतरांपर्यंत, गुन्हेगारी कायद्यांतील बदलांपासून आर्थिक संधीपर्यंत प्रत्येक प्रश्नावर प्रेरणादायी काम करून चांगल्या विश्वाच्या निर्मितीमध्ये हातभार लावा. तुमच्यासारख्या तरुणांनी इतिहासाची दिशा वेळोवेळी बदलून दाखवली आहे. इतिहास पुन्हा नव्याने लिहिण्याची वेळ आली आहे.
9) प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न :तुमच्यातील हिंमत जगाला दाखवा. काहीतरी वेगळे करा. तुम्हाला यश मिळेल. कदाचित अपयशाचा सामनाही करावा लागेल. मात्र, विश्वाची पुनर्निर्मिती हेच तुमच्या आयुष्याचे
एकमेव उद्दिष्ट ठेवा. त्यासाठी सतत प्रयत्नशील राहा.
No comments:
Post a Comment