जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यातून येणारे पाणी पैसे भरुनही सोडण्यात आले नाही. त्याच्या निषेधार्थ कुंभारी , प्रतापूर , गुळवंची , कोसारी , बिरनाळ ,तिप्पेहळी ,बागेवाडी सात गावातील नागरिकानी विजापूर ते गुहागर राज्यमार्गावर कुंभारी येथे दहा जून रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .असा इशारा तहसीलदार सचिन पाटील यांना दिलेल्या निवेदन दिला आहे .
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,वरील सात गावातील नागरिकांनी म्हैशाळ योजनेचे पाणी सुरू करावे व त्यातून आम्हाला पाणी द्यावे यासाठी सहा महिन्यापूर्वी पैसे भरण्यात आले आहेत. परंतु अद्याप पर्यंत पाणी सोडण्यात आली नाही .सध्या गावात पाणी व चारा टंचाई जाणवत असून बागायती पिके वाळू लागली आहेत पाण्याची सध्या नितांत आवश्यकता आहे .त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देताना प्रभाकर जाधव ,नानासाहेब सूर्यवंशी ,नाथा पाटील ,अविनाश सुतार ,नितीन सूर्यवंशी, दिलीप यादव , नवाज मुजावर , दिलीप जाधव, संतोष माळी ,बापू जाधव ,शंकर जाधव इत्यादी मान्यवर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .तुमच्या भावना व मागणी मी शासनाला कळवतो परंतु रास्तारोको आंदोलन आपण पाठीमागे घ्यावे , पाणी सोडण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. अशी सूचना तहसीलदार सचिन पाटील यानी यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना केली परंतु पैसे भरूनही आम्हाला पाणी सोडले जात नाही त्याचा निषेध म्हणून आम्ही प्रतिकात्मकरित्या कुंभारी येथे रास्ता रोको आंदोलन करत आहोत असे या गावातील नागरिकांनी सांगून रास्तारोको आंदोलनावर आपण ठाम असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment