जत,(प्रतिनिधी)-
बँक ऑफ महाराष्ट्र जत शाखेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृध्देचे ४६ हजार पाचशे रूपये अज्ञात चोरट्यांनी लांबवले. सुशिला तुकाराम यमगर (वय 70, रा. बिरनाळ) असे या वृध्देचे नाव आहे. आज, मंगळवार (दि.४) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. चोरीची घटना बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. याबाबत जत पोलिस ठाण्यात नातू तुषार शिवाजी यमगर याने फिर्याद दिली आहे.
मंगळवारी सकाळी 11.30 वाजता शहरातील बनाळी चौकातून भास्कर दर्गाप्पा व्हसमणी (वय 40, रा. कलमडी, विजापूर) यांच्या वरच्या खिशातून सात हजार 500 रूपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या दोन्ही घटना नजीकच्या अंतरावर तासाभराच्या कालावधी घडल्या आहेत. पोलिसांनी बँकेतील फुटेजवरून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी, सुशिला यमगर ह्या बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. आज आठवडा बाजार असल्याने बँकेत गर्दी होती. तसेच इंटरनेट सुविधा बंद होती त्यामुळे मॅन्युअल पद्धतीने ग्राहकांना पैसे देण्याचे काम सुरू होते. सुशीला यमगर यांनी दोन वेळा पैशे काढण्याचे फॉर्म भरून 30 व 20 हजाराची रक्कम काढली होती. नातू तुषार व विक्रम या नातवांसोबत शैक्षणिक कामासाठी पन्नास हजाराची रक्कम जत महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून काढली होती. यापैकी तीन हजार 500 रूपये नातू विक्रम रिक्षा आणण्यासाठी बाहेर गेला होता. उर्वरित ४६ हजार 500 रुपये बॅगेत ठेवले. यादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी बॅगेतून पैसे काढून लंपास केले.
No comments:
Post a Comment