जत,(प्रतिनिधी)-
जत तालूक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून तालुक्यातील ७२ गावात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे कामे सुरू होणे गरजेचे आहे. या गावात कामे सुरू व्हावीत यासाठी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांच्या आदेशानव्ये अधिका-यांची नेमणूक करण्यात आली असून त्यासाठी खास पथक तयार करण्यात आल्याची माहिती जतचे तहसिलदार सचिन पाटील यांनी दिली.
तहसिलदार सचिन पाटील म्हणाले,तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात मनरेगाची कामे सुरू करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रत्येक गावात कामे व कामाचे नियोजन असणे गरजेचे आहे त्यानुसार गावपातळीवर जावून अधिका-यांनी बैठका घ्यावेत यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. ७२ गावात २४ अधिकारी पथक प्रमुख म्हणून नेमले आहेत. प्रत्येक पथकावर तीन गावची जबाबदारी आहे. हे पथक प्रमुख प्रत्येक गावात जावून माहिती घेणार आहे. २८ मे पर्यत पथक प्रमुख गावात पोहचेल व गावातील मजुरांची माहिती, मजुरांकडून कामाची मागणी, मागणीप्रमाणे कामे उपलब्ध करून देणे ही जबाबदारी राहणार आहे. २९ मे ला अहवाल प्राप्त झाल्यानंतर कामाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे तहसिलदार पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment