Sunday, June 9, 2019

बसवेश्वर संदेश यात्रा 12 जूनला जतमध्ये

जत,(प्रतिनिधी)-
महात्मा बसवेश्वर यांच्या वचन साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुणे येथून 26 मे रोजी बसवेश्वर संदेश यात्रा निघाली असून ही यात्रा बुधवार दि.12 जून रोजी जतमध्ये येणार आहे, अशी माहिती  स्वागतोत्सुक डॉ.रवींद्र आरळी यांनी दिली.

डॉ.आरळी म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांनी जातीधर्माला तिलांजली देत समतेचा संदेश दिला. त्यांनी कर्मकांडाला विरोध केला. बसवेश्वर यांच्या वचन साहित्यात जीवनाचे सार आहे. त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी माजी राष्ट्रपती बी.डी.जत्ती यांचे पुत्र अरविंद जत्ती यांनी लोकचळवळ सुरू ठेवली आहे. त्यांनी बसवेश्वर यांचे वचन साहित्य 23 भाषांमधून जगभरात पोहचवले आहे. याचाच एक भाग म्हणून बसवेश्वर संदेश यात्रा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये बसवेश्वर यांची भव्य मूर्ती, बसव वचन साहित्य यांचा समावेश आहे.
12 जून रोजी ही संदेश यात्रा जतला येणार असून  शहरातून या यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. 13 मे रोजी कवठेमहांकाळ येथे तर 14 रोजी सांगलीत ही यात्रा पोहचणार आहे. इथून तासगाव, विटा,कडेगाव मार्गे यात्रा कराडला जाणार आहे, अशी माहिती डॉ. आरळी यांनी दिली.

No comments:

Post a Comment