Friday, May 17, 2019

धान्याची उचल न करणार्‍या कुटुंबांचे रेशनकार्ड होणार रद्द


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. हाताला काम नाही, गावात पाणी नाही अशी विदारक परिस्थिती असताना अनेक कुटुंबात कुटुंबे शहराकडे स्थलांतरित होत आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना रोजगारासाठी शहराकडे धाव घेतली आहे. शिधापत्रिकेवर मिळणारे धान्य उचल करणे अशक्य होऊ लागले आहे. सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीने काढला आहे यामध्ये ज्या शिधापत्रिकेवर सतत तीन महिने धान्याचा उचल झाला नाही. अशा शिधापत्रिका प्रथम निलंबित व नंतर रद्द करण्याचा घाट घातला आहे.

 रोजगारासाठी स्थलांतरित कुटुंबीयांना याचा फटका बसणार आहे. गोरगरीब व मजूर कुटुंबीयांना दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी, या उद्देशाने शासन रेशन कार्डावर स्वस्त धान्य दरात दर महिन्याला धान्य उपलब्ध करून देते. शासनाचा हा उपक्रम अशा कुटुंबीयांसाठी मोठा आधार बनला आहे. धान्य वितरण अधिक पारदर्शक व्हावे, यासाठी शासनानेपॉसमशीनद्वारे धान्य वितरण करण्याचे आदेश स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहे.
 नवीन यंत्रणेमुळे दररोज धान्याची किती वसूल झाली आहे, याची माहिती एका क्लिकवर शासनाला समजू लागले आहे. प्रत्येक हालचालीवर या प्रणालीने लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. परंतु ज्यांनी रोजगारासाठी शहराकडे धाव घेतली आहे, अशा कुठे मिळाला न्याय मिळणार नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांत अनेक गावे ओस पडली आहेत. ऊसतोडीसाठी आणि कुटुंब इतर सामने स्थलांतरित होतात. त्यामुळे त्या गावातील कुटुंब प्रत्येक महिन्यात धान्य उचल करण्यासाठी गावात येणे टाळू लागले आहेत. जाण्याचा खर्च या कुटुंबीयांना परवडणारा नाही. परिणामी अनेकांच्या रेशन कार्डावर दोन-तीन महिन्यांपासून धान्याची उचल झाली नाही. त्यातच आता धान्य वितरण प्रणालीने नवीन आदेश काढले आहेत, ज्या शिधापत्रिकेवर सतत तीन महिने धान्याची उचल नाही, अशी शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक जे कुटुंब रोजगारासाठी गाव सोडून शहराकडे गेले आहे अशा कुटुंबांची शिधा पत्रिका अथवा निलंबित होणार नाही सूट त्यांना देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment