चार आरोपींना अटक
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील पोलिसांवर हल्ला प्रकरण झाल्या नंतर जत पोलिस ठाण्याने अचानक कोबिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांना अटक केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक सांगली यांचे आदेशान्वये व सूचनेप्रमाणे मा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांचे
मार्गदर्शनाखाली जत शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीसांनी जत शहरातील गुन्हेगार राहत असलेल्या वस्त्यावर स्टाफसह कोंबिंग ऑपरेशन राबवले. त्यामध्ये पोलीसांना हवे असलेले व दाखल गुन्हयात पाहीजे असलेले चार आरोपी मिळून आले त्यांना पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे. यामध्ये अचकनहळ्ळी येथे गेल्या वर्षी पडलेल्या दरोड्यातील फरारी आरोपी रमेश नामेदव चव्हाण व सागर रमेश चव्हाण यांना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. कारवाई दरम्यान पोलीसांनी दोन आरोपींविरूध्द दोन दारूबंदीच्या केस दाखल केल्या आहेत. तसेच संशयीत वाटणा-या आठ दुचाकी व एक चारचाकी गाडी पोलीसांनी ताब्यात घेवून काही गाड्यांचे पडताळणी करून गाडीमालकांना परत केल्या आहेत. मा न्यायालयाने काही आरोपीविरुध्द ते न्यायालयात हजर राहत नसल्याने अटकेचे वॉरंट काढले होते अशा चार आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.
सदरचे कारवाईमध्ये जत उपविभागातील जत, कवठेमहांकाळ, उमदी पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा सांगली, दंगल विरोधी पथक सांगली येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
जत तालुक्यातील चोऱ्या उघड करण्याकरीता व त्यांना प्रतिबंध करण्याकरीता अशा प्रकारची कारवाई वारंवार करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगीतले.
No comments:
Post a Comment