जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र
शासनाच्या वतीने दुष्काळ निवारण्यासाठी जत तालुक्यात यापूर्वी पाच चारा छावण्यांना
मंजुरी दिली होती त्या चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. अजून सहा चारा छावण्यांना मंजुरी दिलेली आहे. आतापर्यंत
11 चारा छावण्यांना मान्यता दिली आहे. अशी माहिती
तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले नवीन मंजुरी दिलेल्या सहा चारा
छावण्या मध्ये कुडणूर, बनाळी, वायफळ,
कोसारी , अचकनहळी, आवंढी
या गावातील संस्थांना मंजुरी देण्यात आलेले आहे. सदरच्या चारा
छावण्या तत्काळ सुरू करणे बाबतचा देखील सूचना संबंधित संस्थांना देण्यात आल्या आहेत.
तसेच जत पूर्व भागामध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त असल्यामुळे पाणी टंचाई
असलेल्या ठिकाणी शासन निर्णयानुसार सहकारी साखर कारखाने सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध खरेदी विक्री संघ,
सेवाभावी संस्था, स्वयंसेवी स्वयंसेवी संस्था या
संस्थेनी जनावरांसाठी चारा छावण्या चालू करण्याकरिता प्रस्ताव या कार्यालयात तात्काळ
सादर करण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे व तहसीलदार सचिन पाटील यांनी केलेले
आहे.
No comments:
Post a Comment