Monday, May 20, 2019

शिक्षक बँक म्हणजे शिक्षकांना समृद्ध करणारी बँक : दीपक कोळी

जत, (प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे कामकाज विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे व पारदर्शी सुरू आहे सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय समितीच्या नेतृत्वाखालच्या संचालक मंडळाने घेतली असून व्याजदर कमी करून शिक्षकांना न्याय दिला आहे अशी महाराष्ट्रातील 100% वसुली असणारी आणि शिक्षकांना समृद्ध करणारी एकमेव बँक आहे . बँकेची प्रगती पाहूनच जिल्ह्यातील सभासदांनी दुसऱ्यांदा समितीच्या ताब्यात बँकेच्या चाव्या दिल्या आहेत विरोधकांनी किमान पुढची वीस वर्षे तरी बँकेच्या सत्तेची स्वप्ने पाहू नयेत. तालुका शिक्षण समितीचे नेते दीपक कोळी यांनी लगावला आहे.

दीपक कोळी म्हणाले, गेल्या आठ दिवसापासून जत तालुक्यात वेगवेगळ्या संघटनेचे नेते विनाकारण शिक्षक बँके विरोधात वाचाळ बडबड करीत आहेत. वास्तविक ज्यांना जाहीरनामा म्हणजे काय ही माहित नाही. ते लोक आता बडबड करीत आहेत त्यामुळे या लोकांच्या बोलण्यात फार महत्त्व देण्यात खरच नाही केवळ येत्या वर्षभर येऊन ठेवलेल्या बँकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून बाबुल करण्याचा प्रकार सुरू आहे, परंतु शिक्षक सभासदांचा आढळ विश्वास विश्वनाथ मिरजकर व संचालक मंडळावर आहे गेल्या दहा वर्षात बँकेच्या प्रगतीत समितीने मोठी भर घातली आहे. अनेक प्रकारच्या शिक्षक हिताचे निर्णय घेण्यात आले कर्जात वाढ केली मयत सभासदांचे 20 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. सभासदांना एटीएम सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वीज बिल भरणा केंद्र सुरू केली. सहकारी तत्त्वावर रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव अशी एक नाही तर अनेक कामे मिरज करण्याच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
शिक्षकांच्या हितासाठी जगणारी ही संघटना आहे . संघटना एक वैचारिक पाया आहे राज्यात मजबूत आणि शिक्षकांच्या हितासाठी काम करणारी ही एकमेव संघटना आहे. आज समितीच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरता केंद्र व राज्य स्तरावर पाठपुरावा करीत आहोत. जिल्हा परिषद व पंचायत समिती विविध प्रकारचे वैद्यकीय बिल थकीत बिले सातवा वेतन आयोग हिंदी मराठी सूट वरीष्ट वेतनश्रेणी निवड श्रेणी सेवा पुस्तके अद्यावत करणे. परीक्षा वेदिन कालावधी आधी कामे समितीने वेळोवेळी पाठपुरावा करून मार्गी लावले आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचा मोठा विश्वास आमच्या संघटनेवर आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही  जण नसते सत्तेची स्वप्ने पडत आहेत यावेळी काय वीस वर्षे तरी सभासद त्यांना सत्तेत येऊ देणार नाहीत असा दृढ विश्वास दीपक कोळी यांनी व्यक्त केला.

1 comment:

  1. व्याजदर कमी करायचं पहा कायतरी, आणि चुकीच्या गोष्टी साठी किती पैसे खर्च करता तेही सांगा...

    ReplyDelete