Friday, May 24, 2019

उमराणी येथे कर्जास कंटाळून शेतकर्‍यांची आत्महत्या

 
जत,(प्रतिनिधी)-
उमराणी (ता. जत) येथील बाबु लक्ष्मण यादव (वय 44) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. विविध संस्था व खासगी सावकारकडून असे चार लाख 80 हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. याबाबत जत पोलिस ठाण्यात मल्लेश कत्ती यांनी फिर्याद दिली आहे. 
   अधिक माहिती अशी, सिंदूर - उमराणी रस्त्यावर तीन कि.मी.वर बाबु यादव यांची आडीच एकर शेती आहे. एका एकरात द्राक्षे बाग तर एकात इतर पीक ते घेतात. हे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. त्यांनी उमराणी सर्व सेवा सहकारी सोसायटीकडून चार लाख, अथणी येथील खाजगी सावकाराकडून तीस हजार व  श्री विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, जत यांच्या कडून पन्नास हजार, अशी चार लाख 80 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. 
   दरम्यान, श्री विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने बाबु यांना दि.16 मे रोजी नोटीस बजावली होती. मात्र, पैशाची जुळवा जुळव होत नाही, बँकेचे पैसे कोठून भरायचे, याच विवंचनेत यादव यांनी शुक्रवारी सकाळी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. याचा अधिक तपास पोलिस पवार करत आहेत.

No comments:

Post a Comment