Wednesday, May 15, 2019

विश्वबंधुत्व निर्माण करण्यात बाबा हरदेव सिंह यांचा मोलाचा वाटा - अशोक आहुजा

जत,(प्रतिनिधी)-
ज्यावेळी पृथ्वीवर धर्माच्या नावाखाली अनेक समाज विघाटक घटना घडत आहेत.माणूसच माणसापासुन दुर जाऊ लागला आहे.मानवाचे इतर मानवाबरोबर असलेले प्रेम कमी होत चालले आहे माणूस जातीपातीच्या भिंतीमध्ये आडकुण पडलेला आहे यातुन, त्यामुळे त्याला जिवनामध्ये सुख मिळत नाही यातुन मानवाला मुक्त करण्यासाठी मानवातील माणूसकी जागी करून विश्वबंधुत्व निर्माण करण्याचे  कार्य सदगुरु बाबा हरदेव सिंह  यांनी केले, असे प्रतीपादन संत निरंकारी मंडळाचे अशोक आहुजा (प्रचारक कोल्हापुर) यांनी केले.

        सदगुरु बाबा हरदेव सिंह महाराज याचे स्मृतीनिमीत्त आयोजित 'समर्पण' दिन सत्संग सोहळा  जत येथील एस्.आर.व्ही.एम्.हायस्कुल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की सदगुरु बाबा हरदेव सिंह यांनी संपुर्ण आयुष्य जगाच्या कल्याणासाठी व्यतीत केले.प्रत्येक आवस्थेमध्ये खुश राहण्याचा मुलमंत्र त्यांनी दिला. आध्यात्माबरोबर स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आदी उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला.बाबाजी प्रत्येक कर्म स्वतः करून नंतर जगाला शिकवण देत असत. रक्तदान शिबिराची सुरुवातही त्यांनी  प्रथम स्वतः रक्तदान करुन केली होती. या आध्यात्मीक व सामाजिक  कार्याची दखल घेऊन गांधी ग्लोबल फँमेली मेडल, गांधी पुरस्कार,सर्वश्रेष्ठ   अध्यात्मीक विभुती,डाँ.ए.पी.जे अब्दुल कलाम विश्व शांती पुरस्कार,यु  के मधील प्रतिष्ठित क्विन गोल्डन जुबली अँवार्ड,तसेच संयुक्त राष्ट्र संघाने मिशनला त्याच्या सामाजिक व आर्थिक परिषदेवर जनरल सल्लागाराचा दर्जा दिलेला आहे ,असे सदगुरु बाबाजीचे महान कार्य होते.
      यावेळी संज्योति साळुंखे,नम्रता गोरे,अन्वेशना शिंदे,वैभवी कांबळे व सहयोगी यांनी ''तेरे ऐहसान का बदला चुकाया जा नही सकता '' या आशयाची भक्तीरचना सादर केली .रवीकुमार,गिरमल कांबळे,दिपक मुंडेंचा,सुरेश कोळी,जालिंदर सांगोलकर यांनी विचार व भक्तीरचनेद्वारे भावना व्यक्त केल्या.सुत्रसंचलन शिवाजी जाधव यांनी केले.जोतिबा गोरे,सेवादल संचालक संभाजी साळे यांनी नियोजन केले.

No comments:

Post a Comment