Friday, May 17, 2019

राष्ट्रवादीचा सोमवारी जनावरांसह मोर्चा


जत,(प्रतिनिधी)-
 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दुष्काळी प्रश्नांवर सोमवार, दि. 20 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील व सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे.
भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लोकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन चारा छावणी, टँकरच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते. दुष्काळी भागातील प्रश्नांवर सोमवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील करणार नेतृत्व हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विलिंग्डन महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार आहे. या मोर्चासाठी आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील जनावरांचा समावेश असेल.

No comments:

Post a Comment