जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात
भीषण दुष्काळी परिस्थिती असताना पालकमंत्री व उद्योगमंत्री यांनी नुसत्याच भेटी दिल्या
उपाययोजना कोणत्या झाल्या नाहीत; तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचेही
याकडे दुर्लक्ष झाले आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही,
गुरांना चारा नाही, मजुरांच्या हाताला काम नाही
यामुळे म ाणसांसह जनावरांची होरपळ होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे
दुर्लक्ष होत असल्याने अद्यापही अपेक्षित प्रमाणात उपाययोजना झाल्या नाहीत.
आणखी एक महिना तरी जत तालुक्यातील देशांत दुष्काळाला सामोरे जावे लागणार
आहे. शंभरच्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे चारा टंचाई निर्माण
झाली असून आता कुठेतरी एखादी दुसरी चारा छावणी सुरू झाली आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांची होरपळ होत आहे.
No comments:
Post a Comment