Saturday, May 11, 2019

जलसंधारणाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील  दुष्काळी भागाला नवसंजीवनी देण्यासाठी  जलसंधारणाची कामे सुरू आहेत. सदरची कामे निकृष्ठ पध्दतीने सुरू असून या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी केली आहे.

    तालुक्यातील बोर नदीवर पाढरेवाडी, जालिहाल खुर्द, सिद्धनाथ यासह नऊ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या  बंधाऱ्याचे काम सुरू आहे . शासनाने सुमारे एक कोटी विस लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर केला आहे. जेथे काम सुरू आहे तेथील माती मीश्रीत वाळू बांधकामासाठी वापरली जात आहे. कामावर नियमित पाणी मारले जात नाही. सिमेंटचे प्रमाण कमी वापरले जात आहे.या संपूर्ण कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत  तपासणी  करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी जत येथील स्थानिक स्तर विभागाकडे केली आहे .
     तालुक्यात सुरू असलेली  कामे योग्य गुणवत्तेची नसून या कामासाठ माती मिश्रित वाळू वापरली जात आहे.   बंधाऱ्याचा पाया  कठीण  खडक लागेपर्यंत  काढावा असा नियम  असतानादेखील  त्या पद्धतीने पाया काढलेला नाही, भविष्यात या बंधाऱ्यातून  पाणी गळती होण्याची शक्यता आहे . हे काम संपविण्याचा धडाका ठेकेदाराने चालू ठेवला आहे.  बाधकामावर पाणी मारले जात नसल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे .या कामाची वरिष्ठांनी  चौकशी करावी व दोषी ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सरदार पाटील यांनी केली आहे .

No comments:

Post a Comment