जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात 6 ते 19 मे कालावधीत क्षयरोग शोधमोहीम राबवण्यात येत असल्याची
माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात 34 हजार घरांमधील दीड लाख लोकांचा सर्वे
करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सन 2025 पर्यंत देशातून क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठरविलेले समोर ठेवले
आहे. या सक्रीय क्षयरुग्ण शोधमोहिमेमध्ये दोन आठवड्याचा खोकला,
रात्रीचा ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे, बेडक्यातून रक्त पडणे, तसेच गाठी, गंडमाळा यासारखी लक्षणे असणार्या संशयित क्षयरुग्णांच्या याद्या तयार करून त्यांची तपासणी केली जाणार आहे.
याकरिता झोपडपटटी, मिल कामगार, स्टोन क्रशरवरील कामगार, असंघटित कामगार, बेघर, अनाथ आश्रम, वृध्दाश्रम,
अतिजोखमीचे रुग्ण यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे सर्वेक्षण केले जाणार
आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत डिसेंबर
2017, मे 2018 व डिसेंबर 2018 मध्ये सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये
प्रत्येक वेळेस जवळपास 125 पेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर आले
आहेत. समाजातील लपलेले क्षयरुग्ण शोधून त्यांना लवकरात लवकर उपचाराखाली
आणणे व निरोगी व्यक्तींना होणारी क्षयरोगाची लागण रोखणे हे या सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेचे
उद्यिष्ट आहे. या मोहिमेमध्ये निवडलेल्या जोखीमग्रस्त लोकसंख्येचे
सर्वेक्षण गृहभेटीव्दारे केले जाणार असून या मोहिमेमध्ये एकूण 1 लाख 53 हजार लोकसंख्येच्या 34 हजार
162 घरांचे सर्वेक्षण आरोग्य पथकांमार्फत केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment