जत,(प्रतिनिधी)-
नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात कारवाई करण्यासाठी ई – चलन प्रणाली अस्तित्वात आली असून जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानुसार उमदी पोलीस ठाण्याअंतर्गत मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण सात वाहनावर ई – चलनाद्वारे दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच दारू पिऊन वाहन चालवीत असणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी दिली.
जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशाप्रमाणे ई – चलन पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना मिळताच उमदी पोलिसांनी काल सायंकाळी नियम मोडणाऱ्या वाहनांविरोधात मोहीम आखून कारवाई केली. यामध्ये अनेक वाहनांची तपासणीही करण्यात आली. त्याचबरोबर सात वाहनांवर ई – चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या एका व्यक्ती विरुद्ध कारवाई झाली.
No comments:
Post a Comment