जत,(प्रतिनिधी)-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जत-बिळूर मार्गावर बिळूर गावाच्या हद्दीत सात हजार मेट्रिक टन मळी आणि दोन वाहने असा सुमारे 12 लाख 67 हजार 800 इतका मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जत-अथणी रस्त्यावर बिळूर गावाजवळ संशयीत वाहनांची तपासणी करत असताना एका आयशर मालमोटारीमध्ये (एमएच13 ए एक्स1760) अवैध मळीने भरलेले 36 बॅरेल आढळून आले.तसेच एका महिंद्रा बलोरो गाडीमध्ये (एमएच12 बीसी1271) अवैध मळीने भरलेले तीन बॅरेल आढळून आले.या प्रकरणी एका आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास प्रभारी निरीक्षक आर.व्ही.झोळ करत आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक विश्वजीत देशमुख,निरीक्षक आनंद पवार, दुय्यम निरीक्षक उमा पाटील, मंगेश शेंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक युवराज कांबळे,कर्मचारी संतोष बिराजदार, श्रीपाद पाटील, सुशीलकुमार ढोले, अर्जुन कोरवी यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment